- ८0 इंटरनेट पेजेसवर सरकारची बंदी
नवी दिल्ली। दि. १९ (लोकमत न्युज नेटवर्क)
सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे इशान्य भारतीयांच्या विरोधात अफवा पसरवणार्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला. फेसबुक, गुगल आणि ट्विटरद्वारे ईशान्य भारतीयांविरोधात भावना भडकवण्यार्या ८0 इंटरनेट पेजेसवर रविवारी बंदी घातली.
अफवांचे मूळ पाकिस्तानात असून तेथील भारतविरोधी शक्तींनी तिबेट, थायलंड येथील हिंसाचाराच्या छायाचित्रांवर प्रक्रिया करून ती भारतातील हिंसाचाराची छायाचित्रे आहेत असे भासविले होता. ही चित्रे फेसबुक, गुगल, ट्विटर आणि युट्यूबवर टाकली होता. ईमेल, चॅटिंग, एसएमएसद्वारेही अफवा पसरविण्यात आल्या, असे केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी शनिवारी सांगितले होते. या अफवांमुळेच देशभरातील ईशान्य भारतीयांमध्ये भीती निर्माण झाली होती. ही भीती आता भीती ओसरली असून, ईशान्य भारतीयांचे त्यांच्या स्वगृही परतण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शनिवारी बंगलोर येथून जाणार्या गाड्यांची फक्त ८0 तिकिटे विकली गेली. गुवाहाटीकडे जाणार्या सर्व खास गाड्या रद्द करण्यात आल्या.
पाक म्हणतो..पुरावे द्या!
पाकिस्तानामधील नेटवर्किंग साईटसच्या गैरवापराला आळा घालण्याचे भारताचे आवाहन पाकिस्तानने धुडकावले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्ताने मात्र पुरावे द्या, मगच कारवाईबद्दल बोला, असा पवित्रा घेतला. तसेच दोषारोप करण्याऐवजी भारताने आपले अंतर्गत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असा कांगावाही केला.
अफवांवर ‘सोशल’ बॅन!
लोकमत – सोम, २० ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
या क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा
१९ तास पूर्वीप्रेमाच्या आड वय न आलेले सेलिब्रिटीज
२१ तास पूर्वी'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३

