बोल बोल म्हणता- पद्मिनी दिवेकर
ठरल्याप्रमाणे मी मंगळवारी सकाळी ८ वाजता गिलानींकडे पोहोचण्यासाठी सव्वासातला घरातून बाहेर पडले. त्यांच्याकडे जायला मला कोणताच हायवे घेता येत नव्हता. बरेच सिग्नल असलेल्या ‘७५ स्ट्रीट’ नावाच्या रस्त्यावरून जवळजवळ १३ ते १४ सिग्नल्स पार करून जावे लागणार होते. ट्रॅफिकचा अंदाज आल्यावर जरा मागे-पुढे करू शकले असते. मी नेहमी थेरपीच्या ठिकाणी ५ ते१0 मिनिटे आधी पोहोचते, म्हणजे जरा आधीच्या नोट्सवर नजर टाकून आज काय करूया, याचा अंदाज घेता येतो.
त्याप्रमाणे ८ ला १0 मिनिटे असताना मी गिलानींच्या सबडिव्हिजनमध्ये शिरले. सिक्युरिटीला मला कोणाकडे जायचे आहे त्यांच्या घरचा नंबर आणि नाव सांगितले. यावेळीसुद्धा गिलानींच्या घरचा फोन कोणी उचलत नव्हते. नशिबाने मागचाच सिक्युरिटी गार्ड होता. त्याला मी मला ओळखलेस का म्हणून विचारले. माझे भाग्य थोर आणि तो हो म्हणाला; पण गेट उघडायला तो कां कू करू लागला. तसे मी त्याला स्पष्ट सांगितले,"If I look that dangerous to you, then please escort me to their house." माझ्या त्या बोलण्याने तो वरमला आणि त्याने गेट उघडले. मी गाडी आत नेऊन घराच्या समोर उभी केली. माझी खेळण्यांची पिशवी आणि फाइल घेऊन दरवाजावरची बेल वाजवली.
एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे या घरात माझे जाणे हे स्वागतार्ह नव्हते. निरुबेन क्रिशबरोबर गुजराती बोलते, म्हणून या भारतीय थेरपिस्टला आपल्याला हो म्हणण्याशिवाय पर्याय नाही, हे झीनलला माहीत होते.
माझ्या मनात उगीचच एक हुरहुर दाटून आली होती. झीनलचा नाखूश चेहरा, मुख्य म्हणजे सुरुवातीलाच तिचे माझ्याकडे दुर्लक्ष करणे, प्रथमच माझ्या मनात ही थेरपीची जबाबदारी घेतल्याचा निर्णय योग्य नव्हता, असे वाटत होते. क्रिशला दुसरी थेरपिस्ट, दुभाषा मिळाली असती. कदाचित तो काही दिवस वेटिंग लिस्टवर राहिला असता. मला काय त्याचे? अचानक मागून हलकासा हॉर्न ऐकू आला. लाइट हिरवा झाला होता. मी पटकन माझ्या विचारातून बाहेर पडले.
मी थेरपिस्ट म्हणून जबाबदारी घेतल्यावर, झीनलला काही गोष्टी क्रिशबरोबर करतेस का? उदाहरणार्थ- त्याच्याबरोबर खेळणे, पुस्तक वाचणे, त्याला खायला भरवण्यापूर्वी त्याचे ताट सजवणे, त्याला बीब लावून, खुर्चीत बसवून त्याची जेवण ही गोष्ट मनोरंजक बनवणे वगैरे वगैरे.. असे विचारल्यावर, झीनलने अत्यंत त्रासिक चेहर्याने माझ्याकडे पाहत, ‘निरुबेनला मी ते सगळं सांगितलं आहे, मी खूप बिझी असते, म्हणूनच आपले कल्चर, भाषा येणारी दाई मी भरपूर पैसे देऊन ठेवली आहे.’ हे बोलताना तिचा आढय़ताखोरपणा पावलोपावली दिसून येत होता.
पण तरीसुद्धा क्रिश जर माझ्या गुजराती बोलण्याने प्रगती साधणार असेल, तर तो प्रयत्न करायचा. अशा विचारानेच मी कॉनीने विचारल्यावर हो म्हटले. जर तथाकथित अमेरिकन थेरपिस्ट असेल, तर गुजराती येणार्या दुभाषाची नियुक्ती करावीच लागली असती. म्हणजे खर्च जास्त, कॉनीने म्हणूनच मला लगेच ते विचारले. सध्याची अर्थव्यवस्था पाहता, कॉनीचा निर्णय योग्य होता.
दाराजवळ कोणीतरी आले, बहुतेक निरुबेन असावी. दरवाजा उघडल्यावर मी आत गेले. घरात सामसूम होती. ‘क्रिश क्या छे?’ मी विचारले.
‘उप्पर सुवे छे,’ इति निरुबेन.
‘क्यारे उठसे?’ मी विचारले.
‘खबर नथी, कलाक अर्धो कलाक लागसे.’
‘एनी मम्मीने पुछीने एने निचू लायी आवो. ए बóो पण सुता छे.’ अरे देवा मी घड्याळात बघितले ८.२0 झाले होते. मला ९ वाजता बाहेर पडायलाच हवे होते. क्रिशच्या थेरपीचा बराच वेळ वाया चालला होता. काय करावे सुचत नव्हते. निरुबेनसुद्धा ही काय कटकट आहे, अशा नजरेने माझ्याकडे पाहत होती. तिला माझ्यामुळे झोप नाही, टी. व्ही. नाही.
तेवढय़ात वरून क्रिशच्या रडण्याचा आवाज आला. निरुबेन धावत वर गेली आणि क्रिशला घेऊन खाली आली. क्रिशला तिने माझ्यासमोर खाली ठेवले. त्याला खाली बसणे कठीण होते. त्याचा डायपर पूर्णपणे भरलेला होता. जेमतेम ५ मिनिटे त्याने तग धरली आणि मोठय़ाने किंचाळ्या फोडून तो रडू लागला. मी निरुबेनला हाक मारली. निरुबेन बहुतेक सकाळचा स्वत:चा चहा करून घेण्यात दंग होती. तिला परत हाक मारल्यावर ती आता काय, असा वैतागलेला चेहरा करून माझ्यासमोर उभी राहिली. मी तिला क्रिशचा डायपर बदलायला सांगितला. डायपर बदलला तरी क्रिश रडायचा थांबत नव्हता, त्याला नक्की भूक लागली होती.
मी निरुबेनना म्हटले, ‘त्याला दूध नाहीतर खायला द्या.’
‘एटले माटे क्रिस सुतो होय त्यारेच हुं चा पी लऊ. तमे आवी गया, मने टाइमच नथी.’
तिच्या नाराजीकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केले. ८.४0 झाले होते. झीनल वरून आली. माझ्याकडे न बघता थेट स्वयंपाकघरात गेली.
‘निरुबेन, टी आपो.’ निरुबेन क्रिशचा घाण डायपर तिथेच ठेवून चहा द्यायला गेल्या. झीनल १ मिनिटात चहा घेऊन बाहेर आली आणि डायनिंग रूममध्ये जाऊन बसली. म्हणजे निरुबेनने हात न धुताच चहा ओतला असावा. मुख्य म्हणजे क्रिशचा डायपर बदलताना त्याचे ढुंगण, शू ची जागा वाइप्सनी पुसलीसुद्धा नव्हती. क्रिशचा घाण डायपर अजून बाजूलाच पडलेला होता. त्याचा घाण वास येत होता. क्रिशने पटकन तो उचलला. मी ‘याकी, याकी’ असे म्हटले आणि त्याला डायपर खाली ठेव, असे सांगू लागले. त्याने तो डायपर बाजूलाच फेकला.
निरुबेन स्वयंपाक घरात चहा बिस्किटाचा आस्वाद घेत होत्या.
क्रिश अचानक उठून त्याच्या आईकडे गेला. अजूनही त्याला खायला मिळालेच नव्हते. तो आईजवळ जाऊन जोरजोरात किंचाळायला लागला. झीनल ओरडून निरुबेनना म्हणाली, ‘क्रिशने कुकी आपो.’
मी क्रिशला लांबूनच बबल्स दाखवून बोलावले. तो माझ्याजवळ आला. तेवढय़ात निरुबेननी येऊन तीन-चार कुकीज पटकन कार्पेटवर ठेवल्या. ‘क्रिस कुकी ले.’ मला क्षणभर काय झाले ते कळलेच नाही. त्या घाणेरड्या डायपरपासून दोन इंचावर कुकीज होत्या. क्रिश त्या उचलून तोंडात घालणार तोच मी त्या उचलल्या. निरुबेनना म्हटले ‘अहो, एक प्लेट द्या, त्यात दुसर्या कुकीज द्या.’
‘त्याला प्लेटमध्ये दिले तरी तो सर्व कार्पेटवर खालीच फेकतो आणि खातो.’
निरुबेन मला जोशात म्हणाल्या.
तिथून १५ फुटांवर असलेल्या झीनलच्या चेहर्यावरची रेषादेखील हलली नाही. ‘आय अँम अमेरिकन मॉम’, तिचे इव्हालच्या वेळचे वाक्य मला आठवत होते. ही कसली अमेरिकन मॉम?
म्हणून काय त्याला प्लेट किंवा बाऊल द्यायचाच नाही? ‘त्याला हाय चेअरमध्ये ठेवा. अगदी थोडे खाणे ट्रेवर ठेवा. ते त्याने खाली फेकले तरी तो तोंडात घालणार नाही. बाकी तुम्ही त्याला एका बाजूने भरवा.’
‘नो नो, नो फीडिंग,’ झीनल आमच्याजवळ येऊन जोरात म्हणाली. ‘क ६ंल्ल३ ँ्रे ्रल्लीिस्रील्लीिल्ल३.’
‘माझे म्हणणे एवढेच आहे की, त्याला असे कार्पेटवर खायला देऊ नका,’ मी माझा राग आवरून म्हटले.
कधी कधी मुलाच्या भाषावाढीमध्ये आणि वाचावृद्धी (२स्रीूँ ीि५ी’स्रेील्ल३) मध्ये असे सहज लक्षात येणारे दोष असतात, ते दूर केले की मूल चटकन प्रगती करते. अशा दोषांचे अचूक निदान करणे आणि मुलाशी संवाद साधायला त्याचे मोटिव्हेटर्स शोधणे महत्त्वाचे असते. जन्माला आल्यापासून मुलाशी कोण, कसा, आणि कोणत्या पद्धतीने संवाद साधतो यावर त्याची प्रगती अवलंबून असते.
क्रिशच्या बाबतीत मला ते कळणे सोपे होते. आई ‘अमेरिकन मॉम’ होण्याच्या नादात काही गोष्टी लक्षात घेत नव्हती. अमेरिकन मॉम म्हणजे जी पूर्ण वेळ काम करत असली, तरी मुलाच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगल्या पाळणाघरात ठेवते. तिथे मुलांच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने खूप उपक्रम राबवले जातात. त्यात इथले सण साजरे करणे, हस्तकला, चित्रकला, खेळ, खेळातून अक्षरओळख, सहली, गाणे, पोहणे यांचे प्रशिक्षण, पालक आणि मुले मिळून गेट टू गेदर, त्यातून इतर पालकांची ओळख वगैरे.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळणे. सकाळी ८ वाजता नाश्ता, १0.३0 ला एखादे फळ, क्रॅकर, १२ वाजता जेवण, १ ते २.३0 झोप, याव्यतिरिक्त मुले सकाळी ६.३0 ते संध्याकाळी ६ पर्यंत ही मुले वर सांगितल्याप्रमाणे बर्याच गोष्टीत दंग असतात.
मी क्रिशला फिरताना लाइट लागणारा भोवरा दाखवून हसवत होते. भोवरा फिरायचा थांबल्यावर, ‘े१ी, अजी जोये, फरीथी करू?’ असे म्हणून त्याची हातानी बोटे जुळवून करायची खूण शिकवत होते. १५ मिनिटांनी मी आवरायला सुरुवात केली. माझ्या थेरपी नोट्स लिहून झीनलला म्हटले, ‘सही कर.’
‘यु हीअर केम ८ क्लोक, बट नो थेरपी वन अवर, हाऊ आय साईन फॉर वन अवर.’
झीनलशी एकही शब्द बोलण्याची माझी इच्छा नव्हती. देवकृपेने मिळालेले रूप आणि त्या बळावर मिळालेला डॉक्टर नवरा याव्यतिरिक्त कोणतीच जमेची बाजू नाही. झी टी. व्ही. च्या धिंगाण्याला ‘अवर कल्चर’ म्हणणारी, मुलाचा सर्वांगीण विकास हा शब्दसुद्धा माहीत नसणारी झीनल मला या थोडक्या काळासाठी भेटणार होती इतकेच.
नोट्सचा कागद मी सही न घेता आत ठेवला आणि त्याक्षणी निर्णय घेतला की, आता मी इथे परत येणार नाही. गाडीत बसून सिक्युरिटी पोस्ट जवळ गाडी उभी केली आणि आत जाताना माझी सही आणि आत जाण्याची वेळ असलेल्या कागदाची कॉपी आठवणीने घेतली. ही केस मी का ड्रॉप करत आहे त्याचे डॉक्युमेंटेशन तयार करण्यासाठी त्याची गरज होती.

