आता प्रफुल्ल पटेल अडचणीत

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २१ - प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक खात्याचा कार्यभार असतानाच्या काळात झालेल्या विमान खरेदीच्या व्यवहारांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला नोटिस बजावली.

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पटेल हवाईवाहतूक मंत्री असताना झालेल्या विमान खरेदीमुळे मोठ्या प्रमाणावर सरकारचे नुकसान झाल्याचा दावा करणारी एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत हवाई वाहतूक मंत्रालयाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली.