झिम्बाब्वे स्पध्रेबाहेर
कोलंबो। दि. २0 (वृत्तसंस्था)
ज्ॉक्स कॅलिसच्या भेदक मार्यानंतर (४/१५) द.आफ्रिकेचे सलामीवीर रिचर्ड लेव्ही (नाबाद ५0) तसेच हाशिम अमला (नाबाद ३२) यांनी झिम्बाब्वेचे देऊळ पाण्यात बुडविले. आज येथे झालेल्या विश्व टी-२0 स्पर्धेतील क गटाच्या सामन्यात आफ्रिकेने झिम्बाब्वेचा दहा गड्यांनी सहज पराभव करीत त्यांना घरची वाट दाखविली.
लेव्हीने ४३ चेंडू टोलवून ६ चौकारांसह नाबाद ५0 धावा केल्या तर अमला तीन चौकारांसह ३२ धावा काढून नाबाद राहीला. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. आफ्रिकेने ९४ धावांचे लक्ष्य १२.४ षटकांत गाठले. या पराभवानंतर झिम्बाब्वेचे आव्हान संपले आहे. आफ्रिकेने या विजयासह सुपर एध्ये प्रवेश केला तरी २२ ला लंकेविरुद्ध होणार्या सामन्याद्वारे या गटात अव्वल कोण याचा निर्णय होणार आहे.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्या झिम्बाब्वे संघाने २0 षटकांत ८ बाद ९३ धावा केल्या होत्या. यावेळी ज्ॉक्स कॅलिस याने कारकिर्दीतील सवरेत्कृष्ट मारा करीत १५ धावांत ४ बळी घेतले. झिम्बाब्वेवर संघाकडून क्रेग इर्विन याने ४0 चेंडूंवर ३७ धावा केल्या. झिम्बाब्वेचा स्टुअर्ड मॅटसिकेनेरीने ११ धावा केल्या. या व्यतिरिक्त त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. कॅलिसशिवाय मोर्केलने १६ धावांत दोन गडी बाद केले. डेल स्टेनने एक गडी टिपला.
झिम्बाब्वे : मस्कद्जा झे. लेव्ही गो. मोर्केल ७, सिबांडा त्रि. गो, मोर्केल शून्य, ब्रेंडन टेलर झे. डिव्हिलियर्स गो, मोर्केल ४, इर्विन झे. डिव्हिलियर्स गो. कॅलिस ३७, मेत्सिकेनियारी झे. पीटरसन गो. कॅलिस ११, चिगंम्बुरा पायचित गो. कॅलिस १, क्रेमर झे. डिव्हिलियर्स गो. कॅलिस ६, उत्सेया झे. डिव्हिलियर्स गो. स्टेन ५, रेमन्ड प्राईस नाबाद ७, जार्विस नाबाद ९, अवांतर - ८, एकूण- २0 षटकांत ८ बाद ९३ धावा. गडी बाद क्रम- १/२, २/६, ३/१६, ४/५१, ५/५१, ६/६0, ७/७५, ८/७७. गोलंदाजी- डेल स्टेन ४-0-९-१, मोर्ने मोर्केल ४-0-१६-२, एल्बी मोर्केल ४-0-२६-१, योहान बोथा ३-0-१६-0, रॉबिन पीटरसन १-0-८-0, ज्ॉक्स कॅलिस ४-१-१५-४.
द. आफ्रिका : रिचर्ड लेव्ही नाबाद ५0 , हाशिम अमला नाबाद ३२ अवांतर : १२ एकूण- १२.४ षटकांत बिनबाद ९४ धावा. गोलंदाजी : जार्विस ३-0-२0-0, व्हेट्टोरी २-0-२१-0, प्राईस ३-0-१९-0, उत्सेया २-0-१३-0, क्रेमर २-0-१0-0,मेत्सिकेनयेरी 0.४-0-३-0.

