वसमत। दि.७(वार्ताहर)
आडत व्यापारी कालीदास काकडे खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने आज सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून हा खून पांडुरंग लोखंडे, शंकर पारवे (दोघे रा. पिंपळा लोखंडे) यांनी केला होता.
या प्रकरणाचा उलगडा वसमत पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स्वरून करण्यात यश मिळविले होते. दोन्ही आरोपीस आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणामागे नेमके कारण व यात आणखी कोणी आरोपी आहेत काय? याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले. यापूर्वी अटक केलेले शिवानंद नरवाडे व शोभाबाई सोनटक्के यांचा या प्रकरणात काहीही सहभाग नसला तरी त्यांची चौकशीअंती सुटका करण्यात येणार असल्याचे पोनि पाटील यांनी सांगितले.
आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी
लोकमत – बुध, ८ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३रणबीरसोबत थिरकली माधुरीची पावले
बुध, १५ मे २०१३हॅपी बर्थ डे डिअर माधुरी...!!
मंगळ, १४ मे २०१३हिंदी मालिकेतल्या मराठी नायिका
बुध, ८ मे २०१३
