बर्फीमध्ये प्रियंका चोप्रा आणि रणबीर कपूर यांच्यासारखे कलाकार असतानाही, नवोदित इलियाना डी क्रूज लक्षात राहते. बर्फीचे यश आणि इलियानाच्या अभिनयाने तिच्यासाठी बॉलीवूडमध्ये बर्याच संधी निर्माण केल्या आहेत. इलियानाला सध्या बॉलीवूडच्या अनेक ऑफर्स मिळत आहेत, काही ऑफर्स तिने स्वीकारल्याही आहेत. त्यामुळे इलियानाने आता मुंबईकर होण्याचा निर्णय घेतला आहे. इलियाना लवकरच मुंबईमध्ये शिफ्ट होणार असून, सध्या ती घराच्या शोधात असल्याचे तिचे म्हणणे आहे.याचा अर्थ ती तेलगू चित्रपटांना बाय बाय करणार असा नाही. इलियानानुसार तिची ओळख तेलगू चित्रपटांमुळे आहे आणि त्यामुळे पुढेही ती तेलगू चित्रपट करत राहणार आहे; पण आता तिला बॉलीवूडमध्येही काम करायचे आहे. हिंदी चित्रपट क्षेत्र खूपच व्यापक आहे, जवळपास सगळीकडेच हिंदी चित्रपट पाहिले जातात. बर्फीमुळे आपल्या फॅन्सच्या संख्येत खूप वाढ झाली आहे, त्यामुळे हिंदी चित्रपट करत राहणार असल्याचे ती म्हणते.
इलियाना होणार मुंबईकर
लोकमत – मंगळ, ९ ऑक्टोबर २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
१७ तास पूर्वीदोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

