ऑनलाइन टीम
मुंबई - बॉलीवूडमधली तुफान मागणी असलेली करीना कपूर अस्खलित मराठी बोलते अशी नवीनच माहिती समोर आली आहे. बॉलीवूडमधल्या अमराठी कलाकारांपैकी फारच थोड्या कलाकारांना मराठीचा गंध असतो असा अनुभव आहे. आमिर खानसारखा एखादा मराठी शिकण्याचा आग्रह धरतो आणि शिकवणी लावतो तर शाहरुख खानसारखा दुसरा दिग्गज वानखेडेवर झालेल्या गोंधळात तिथल्या अधिका-यांनी आपल्याला मराठीत शिव्या दिल्या त्या आपल्याला कळल्या नाहीत असे सांगतो.
बॉलीवूडमध्ये तांत्रिक विभागांमध्ये मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर असल्याने तिथे मराठीची वानवा नसते परंतु आघाडीच्या नट-नट्यांच्या मराठीच्या ज्ञानाबद्दल प्रश्नचिन्हच असते. असे असताना करीना चक्क शुद्ध मराठी बोलते याचा अनुभव हिरॉइनच्या सेटवर आला आहे. मधुर भांडारकरच्या या सिनेमामध्ये अनेक सहकारी मराठी असल्याने त्यांच्यासोबत आणि मधुरबरोबर करीना मराठीतच बोलत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुरवातीला मधुरलाही करीनाचं अस्खलित मराठी ऐकून धक्का बसला होता असं म्हणतात.
कदाचित हा आजोबांचा वारसा करीनाकडे आला होता. तिचे आजोबा म्हणजे राज कपूर हे येथल्या मातीशी घट्ट जोडले असल्याचे सांगितले जाते. चेंबूरमध्ये असलेल्या आरके स्टुडियोमुळे कपूर खानदानाचा मराठीशी चांगलाच परीचय असणार. आरके स्टुडियोमध्ये राज कपूरच्या काळात होळीसारखे खेळही मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. आणि खास मराठी सण असलेला दही हंडीसारखा उत्सव रंगीत पडद्यावर लोकप्रिय करणारा नटही शम्मी कपूरच होता. त्यामुळे एकूणच कपूर लोकांची मराठीशी नाल जुळलेली असून करीनाच्या रुपाने ती पुढच्या पिठीतही उतरल्याची शक्यता आहे.
करीना म्हणे अस्खलित मराठी बोलते
लोकमत – शुक्र, ३ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
दोन पिढ्यांची एकच नायिका
१४ तास पूर्वीलोकमतमध्ये रणबीर-दीपिका
१९ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
२० तास पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३

