लंडन । दि. ११ (विशेष प्रतिनिधी)
ऑलिम्पिक संपण्याच्या एक दिवस आधी योगेशवर दत्तने भारताच्या खात्यात आणखी एक कास्य पदक जमा करून सुखद धक्का दिला. ६0 किलो वजन गटात फ्रिस्टाईल कुस्तीत योगेश्वरने पहिला फेरी गमावल्यानंतरही रिपेचेजमध्ये आलेल्या कांस्य योगाचा अचूक फायदा घेत ऐतिहासिक कामगिरी केली. निर्णायक लढतीत त्याने उत्तर कोरियाच्या जो मायुंग राईला ३-१ ने लोळविले.
लंडनमधील भारताचे हे चौथे कास्य आणि एकूण पाचवे पदक ठरले. विजयकुमार याने रौप्य तर गगन नारंग, मेरी कोम आणि सायना नेहवाल यांनी कांस्य पटकावून यापूर्वी भारताची शान उंचावली आहे. महाबली सतपालच्या या शिष्याने कारकिर्दीतील तिसर्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचे स्वप्न साकार करताना बीजिंग ऑलिम्पिकमध्ये गुरुबंधू सुशील कुमारने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. या वजनी गटात अझरबैझानच्या असगारोव्ह टोघरुलने सुवर्णपदकाचा मान मिळवला. उपउपांत्यपूर्व फेरीत योगेश्वरवर मात करणारा रशियाचा मल्ल बेसिक कुदुखोव्हला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रेपेचेजच्या आधारावर दुसर्या गटातून अमेरिकेचा मल्ल स्कॉट कॉलेमन कांस्यपदकाचा मानकरी ठरला. योगेश्वरने रेपेचेज राऊंडच्या पहिल्या लढतीत पुएर्ता रिकोच्या फ्रँकलिन गोमज मातोसचा ३-0ने तर दुसर्या लढतीत इराणच्या मल्ल इस्माईल पुरज्योयबारी मसूदचा ३-१ ने पराभव केला. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील या मल्लाने पहिल्या फेरीत बुल्गारियाच्या अनातोली इलारियोनाव्हिच गुइदियाचा पराभव केला होता, पण उपउपांत्यपूर्व फेरीत त्याला चार वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळवणार्या रशियाच्या बेसिक कुदुखोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. रशियाच्या मल्लाने अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे योगेश्वरला रेपेचेजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रेपेचेज लढतीवर लक्ष ठेवून असलेल्या कोट्यावधी भारतीय चाहत्यांना योगेश्वरने निराश न करता कांस्यपदकाचा मान मिळविला.
तिसरा कांस्यवीर
ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा योगेश्वर तिसरा मल्ल ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव (हेलान्सिकी १९५२) सुशील कुमार (बीजिंग २00८) यांनी अशी कामगिरी केली आहे.
आज सुशीलचा ‘सुवर्ण‘योग?
शेवट जवळ आला तरी भारताच्या खात्यावर अद्याप सुवर्णपदकाची नोंद झालेली नाही. त्यामुळे सुशीलकुमारवरच सुवर्ण पदकाची आशा अवलंबून आहे. ६६ किलो वजन गटात बिजिंग कांस्य विजेता सुशील रविवारी भारताचे आव्हान सादर करेल. यंदा तो सुवर्ण पदकाचे प्रबळ दावेदार आहे.
कांस्य ‘योग’!
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
२२ तास पूर्वीदोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

