खुलताबाद। दि. ११ (वार्ताहर)
श्रावण महिन्यातील चौथा व अखेरचा शनिवार त्यातच महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुटी होती. त्यामुळे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याने खुलताबाद, वेरूळ, दौलताबाद येथे मोठय़ा प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्या दिवसभर तशाच होत्या. ‘जय भद्रा हनुमान की जय’, ‘जय भद्रा’ आदी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता.
दौलताबाद, वेरूळ, खुलताबाद आदी रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
जवळपास सहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या गर्दीने सर्व व्यवस्था कोलमडल्या गेल्या.
भाविकांनी परिसरातील पर्यटनस्थळाला भेटी देऊन निसर्गाचा आनंद घेतला.
वेरूळ, दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम
श्रावण महिन्यातील अखेरचा शनिवार व त्यामध्ये शनिवार, रविवार अशा लगत सुट्या आल्याने रात्रीपासून भाविकांची लक्षणीय गर्दी दिसत होती. दुपारी बारा वाजेपासून औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, फुलंब्री रस्त्यावरून भाविकांची वाहने सुरू झाल्याने त्यातच येणारी व जाणारी वाहने एकाच रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतुकीची एक-एक तास कोंडी होत होती. दौलताबाद वेस, घाट, वेरूळ, घृष्णेश्वर मंदिरासमोरील कन्नड रस्ता, भद्रा मारुती रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याने भाविकांना त्रास झाला. पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मोठी दमछाक झाली.
खुलताबादेत गर्दीचा उच्चांक
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
आगामी...इश्क इन पॅरिस
शनि, १८ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३रणबीरसोबत थिरकली माधुरीची पावले
बुध, १५ मे २०१३हॅपी बर्थ डे डिअर माधुरी...!!
मंगळ, १४ मे २०१३
