पुणे। दि. १९ (प्रतिनिधी)
राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या पद्धतीची वेशभूषा करून त्याचे फोटो शूट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली मॉडेल गहना वसिष्ठ हिची आज न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
गहना वसिष्ठ ऊर्फ वंदना रवींद्र तिवारी असे त्या मॉडेलचे पूर्ण नाव आहे. याप्रकरणी रवींद्र ब्रrो (वय ४0, रा. गणेशखिंड रोड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्रrो हे इंटरनेटवर सर्र्फिंंंग करीत असताना फिल्मो डॉट कॉम या बेवसाईटवर त्यांना वसिष्ठ हिचे आक्षेपार्ह फोटो आढळले. त्यानंतर त्यांनी १२ जुलै रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये मुंबई येथील एका बिचवर वसिष्ठ हिने अश्लील फोटो शूट केल्याचे आढळून आले आहे.
फोटो शूट करणार्या व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे तसेच तिने बिकनी म्हणून वापर केलेला ध्वज हस्तगत करायचा आहे. तिने काढलेल्या ईल फोटोचा गैरवापर केला आहे का याचा शोध घ्यायचा असल्याने तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली.
इंटरनेटवर अपलोड केलेले फोटो हे एका न्यूज चॅनलने केले आहेत. ज्या फोटोकरिता गुन्हा दाखल झाला आहे ते वर्षभरापूर्वी काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाच्यावतीने अँड. o्रीकांत शिवदे यांनी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राहय धरून वसिष्ठ हिची ५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
गहनाची जामिनावर सुटका
लोकमत – सोम, २० ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
दोन पिढ्यांची एकच नायिका
१० तास पूर्वीलोकमतमध्ये रणबीर-दीपिका
१६ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
१७ तास पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३

