गोपाल कांडा पोलिसांना शरण

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१८ - एअरहोस्टेस गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरणातील आरोपी आणि हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा आज सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक विहार पोलिस ठाण्यात शरण आले.
शरण आल्यानंतर पोलिसांनी गोपाल कांडा यांना अटक केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून कांडा फरार होते. शुक्रवारी दिल्ली उच्‍च न्‍यायालयाने कांडा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर आज पहाटे चारच्या सुमारास कांडा पोलिसांना शरण आले. गोपाल कांडा यांच्यासोबत त्यांचा भाऊ गोविंद कांडा यालाही माहिती लपवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
गोपाल कांडा यांच्या त्रासाला कंटाळून गीतिका शर्मा या एअर-होस्टेसने नवी दिल्लीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी कांडा यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.