जी-२0मध्ये भारताचे स्थान प्रभावी!

फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष बेन बर्नेक यांचे मत

मुंबई। दि. १0 (प्रतिनिधी)

जी-२0 देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान अधिक प्रभावी झाले असून, भविष्यातच नव्हे वर्तमानातही भारताचा आर्थिक दबदबा वाढला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष बेन बर्नेक यांनी येथे दिली.

अमेरिकेचे वित्तमंत्री टिमोथी गेथनर आणि रिझर्व्हचे अध्यक्ष बेन बर्नेक दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आहेत. दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी बर्नेक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. बर्नेक यांनी भांडवली ओघ वाढविण्यासाठी असलेली कार्ययोजना आहे आणि त्याचे परिणाम यासंदर्भात चर्चा केली. तत्पूर्वी सकाळी गेथनर आणि बर्नेक या दोघांनी देशातील आघाडीच्या उद्योगपती आणि बँकर्सची चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने सुधारणा, अमेरिकी अर्थव्यवस्थेबाबत गेथनर या मुद्दय़ांवर ऊहापोह केला. तसेच अमेरिकेचे वित्तीय धोरण, आर्थिक मंदी आणि भारतातील आर्थिक सुधारणा आदी मुद्दय़ांवरही चर्चा केली. काल दिल्लीत केलेल्या वक्तव्याचाच पुनरुच्चार करताना भारत करीत असलेल्या आर्थिक सुधारणांचा मोठा आणि सकारात्मक परिणाम व्यापारउद्दीम वाढण्यास होणार असल्याचे मत मांडले.

भारताने अलीकडेच केलेल्या

आर्थिक सुधारणांबाबत अमेरिका खूपच सकारात्मक आहे.

- दीपक पारेख, चेअरमन, एचडीएफसी