देवणी। दि. ११ (वार्ताहर)
बेलसकरगा येथील एका ४५ वर्षीय नागरिकाचा अज्ञात मारेकर्यांनी तीक्ष्ण हत्याराने खून केला. ही घटना मोघा शिवारात ९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात मारेकर्यांविरूद्ध देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलसकरगा येथील सोपान माधव गिरी (४५) हे आपल्या कंधारच्या नातेवाईकांना तिरूपतीकडे पाठविण्यासाठी म्हणून तोगरी क्रॉसवर ९ ऑगस्ट रोजी आले होते. ते त्यांना पाठवून दुचाकीवरून परत गावाकडे रात्री जात होते. तोगरी क्रॉस ते मोघा रस्त्यावर अज्ञाताने पाठीत तीक्ष्ण वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मारेकर्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थ व पोलिस यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळास पोलिस उपाधिक्षक पंडित नवसारे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मयताचा मुलगा नामदेव गिरी याच्या फिर्यादीवरून देवणी पोलिस ठाण्यात गुरनं ८१/१२ कलम ३0२ भादंविप्रमाणे अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासकामी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही कोणास अटक वा ताब्यात घेण्यात आले नाही. तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक एल.बी. नालमवार करीत आहेत.
तीक्ष्ण हत्याराने एकाचा खून
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
३ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
४ तास पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३
