देशी साखर विदेशात झाली कडू
रूपेश उत्तरवार। दि. १४ (यवतमाळ)
गतवर्षी देशभरात साखरेचे जादा उत्पादन झाले. यामुळे केंद्र शासनाने ४0 लाख टन साखर निर्यातीसाठी खुली केली. मात्र साखर खुली करताच बाहेर देशात साखरेचे दर पडले. यामुळे निर्यात होणारी साखर संकटात सापडली आहे.
देशभरात साखरचे उत्पादन करणारे प्रमुख तीन राज्य आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्याचा समावेश आहे. या तीन राज्यामध्ये सध्या दुष्काळाचे सावट आहे. यामुळे साखरेचे उत्पादन महाराष्ट्रात ३५ लाख टनाने घटण्याचा अंदाज आहे. यातूनच देशांतर्गत बाजारात साखरेचे दर दीड महिन्यात ७५0 रुपये प्रती क्विंटल दराने वाढले आहेत.
गत तीन वर्षांंंपासून ऊस उत्पादकांना मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागला. गतवर्षी साखरेचे चांगले उत्पादन राहीले यामुळे ४0 लाख टन साखरेला केंद्र शासनाने निर्यातीची परवानगी दिली. यावेळी साखरेचे दर ६६0 रुपये डॉलर प्रती टन होते. सध्याच्या स्थितीत साखरेचे दर ६२१ रुपये डॉलर प्रती टना पर्यंंंत येवून पोहचले आहे. हा दर ३३५0 रुपये प्रतीक्विंटल आहे. तर देशांतर्गत बाजारात साखरेचे दर ३७00 रुपये क्विंटलवर पोहचले आहे. परिणामी साखर उत्पादकांना विदेशात साखर विक्रीचा कटू अनुभव अनुभवायला मिळत आहे. यामुळे साखर उत्पादकांनी आता निर्यातीकडे पाठ फिरविली आहे.
देशात ४0 टक्के साखरेचे उत्पादन महाराष्ट्रात होते. या ठिकाणी दुष्काळी स्थिती राहील्याने सव्वा कोटी टन ऊस चार्यासाठी कापला गेला आहे. आणखी २५ ते ३0 लाख टन ऊस चार्यासाठी कापल्या जान्याची शक्यता आहे. यामुळे साखरेचे उत्पादन ३५ लाख टनाने घटन्याचा अंदाज कारखानदार वर्तवित आहेत.
देशात ३७00 तर परदेशात ३३00 रुपये दर
लोकमत – बुध, १५ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
हे शतक हिरकणींचेच
१७ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
शनि, १८ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३रणबीरसोबत थिरकली माधुरीची पावले
बुध, १५ मे २०१३
