नकली बॉम्ब ठेवणार्‍याचा शोध सुरू

पुणे। दि. ८ (प्रतिनिधी)

कोरेगाव पार्क परिसरातील ताज ब्ल्यू डायमंड हॉटेलसमोर नकली बॉम्ब ठेऊन नाहक भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजची तपासणी केली जात आहे.

लाल रंगातील प्लास्टिकचे ६ पाईप एकमेकांना जोडून दोन वायरींसह घड्याळ बसविलेल्या बॉम्बसदृश्य वस्तूमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बॉम्ब ठेवण्यात आलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आरोपी सापडल्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली.