मुंबईत 46 टक्के मतदान
मुंबई। दि. 16 (प्रतिनिधी)
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात पेटून उठलेल्या मुंबईकरांनी मतदानाच्या दिवशी मात्र निरुत्साहाच दाखविला़ मतनोंदणी मोहिमेत 19 लाख मतदार वाढल्यामुळे मतदान तीन टक्के वाढले खऱे मात्र मुंबई महापालिकेत महिलांच्या टक्क्यांप्रमाणो मतदानाचा आकडा पन्नाशीही पार करु शकला नाही़ मागच्या 15 वर्षापासून मुंबईतील मतदानाचा टक्का 46 वरच स्थिरावला आह़े
मुंबई महापालिकेच्या 13 व्या निवडणुकीसाठी 227 वॉर्डामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली़ 1997 पासून मतदानाचा टक्का दरवर्षी घसरत असल्याने यंदा राज्य निवडणूक आयोगाने जनजागृती मोहीम राबविली होती़ मतदारांसाठी हेल्पलाईन, माहितीपर वेबसाईट अशा माध्यमातून मतदारांर्पयत पोहोचण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला़ त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दोन लाख 92 हजार नवीन मतदारांची नोंद झाली होती़
मात्र पाच वर्षात वाढलेल्या 19 लाख मतदारांच्या तुलनेत हा आकडा नगण्य असल्याचे मानले जात आह़े सार्वजनिक सुट्टी मिळनूही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही़ मतदानाच्या सुरुवातीच्या दोन तासांमध्ये जेमतेम 8़4क् टक्के मतदान झाल़े पुढील दोन तासांमध्ये हा आकडा 14 टक्क्यांनी वाढला़
मात्र दुपारनंतर प्रत्येक दोन तासांमध्ये मतदानात जेमतेम दहा टक्केच वाढ होत राहिली़ रात्री 9 वाजेर्पयत 18 वॉर्डाच्या आकडेवारीनुसार 44 टक्के मतदान झाले होत़े मात्र उर्वरित वॉर्डातून आकडेवारी मिळाल्यानंतरही ही वाढ दोन टक्केच असेल, असे मत आयुक्तांनी व्यक्त केल़े
