नीरा-भीमाच्या वतीने १00 रुपयांचा दुसरा हप्ता

बावडा। दि. १७ (वार्ताहर)
शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचा दुसरा शंभर रुपयांचा हप्ता कारखान्याचे संस्थापक, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला.
बावडा येथे पत्रकारांना माहिती देताना पाटील म्हणाले, ३0 ऑगस्टपूर्वी ही रक्कम ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. गत हंगामात कारखान्याने ५ लाख २३ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. पुढील गळीत हंगामाची तयारी करण्यात आली आहे. उपलब्ध क्षेत्रामधून सुमारे तीन लाख टन व गेटकेनमधून १ लाख टन ऊस मिळणार आहे. तसे करार करण्यात येत आहेत. ऊस वाहतुकीसाठी १८७ टॅक्टर, ६00 बैलगाड्यांचेही करार करण्यात आले आहेत, अशी मंत्री पाटील यांनी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष विलास वाघमोडे, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, विकास पाटील, धनंजय कोरटकर, चंद्रकांत भोसले, अँड. देवकर, तानाजी नाईक, अशोक जगदाळे, बी. बी. नवले उपस्थित होते.