नौदलातर्फे जनजागृती

सागरी तट सुरक्षेबाबत सतर्कता

o्रीवर्धन। दि. ६ (वार्ताहर)
भारताच्या सागरी सीमांवरून भूतकाळात घडलेल्या घटनांचा अनुभव विचारात घेता देशात सागरी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आल्या आहेत.
भारतीय नौदल कोस्ट गार्ड, पोलीस कस्टम्स मरीन पोलीस इ. यंत्रणा सागरात विविध प्रकारे गस्त घालून हे काम प्रभावीपणे करीत असतात. त्यादृष्टीने लोकांमध्ये जागृती होण्याचे दृष्टिकोनातून भारतीय नौदलातर्फे सागरी किनारे असलेल्या गावातून सागरी तट सुरक्षेबाबत जागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत o्रीवर्धन येथेही एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस सागरी सुरक्षा दलाचे सदस्य व मच्छीमार बांधव उपस्थित होते. सभेसाठी पश्‍चिमी नौसेना कमांडचे लेफ्टनंट अश्‍विन भोगे व मेहता (सी. पी. ओ.) हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक आर. जी. रासकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच नगरसेवक चंद्रकांत भगत यांनी सागरी सुरक्षेबाबत काही उपाययोजना सुचविल्या. त्यानंतर लेफ्ट. भोगे यांनी उपस्थितास सागरी तट सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सागरी सुरक्षेबाबतीत सर्वात महत्त्वाची जबाबदारी मच्छीमार बांधवांची असते. ते मच्छीमारीसाठी सतत समुद्रात असतात. त्यांच्याकडून समजणारी माहिती महत्त्वाची असते. भारतीय नौसेना ही आपली मित्र असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.