पालिका अर्थसंकल्प मंजूर

मुंबई। दि. १ (प्रतिनिधी)
पालिकेच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीमध्ये अंतिम मंजुरी देताना विविध योजनांसाठी एकूण पाच कोटी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ४0 लाखांचा विकास निधी, नगरसेवकांना अँण्ड्रॉईड मोबाईल व पालिका शाळेतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन आणि नोकरदार महिलांकरिता पालिका रुग्णालयांमध्ये पाळणाघर या योजनांचाही समावेश आहे.
२0१२-२0१३ या आर्थिक वर्षासाठी पालिकेने २६ हजार ५६७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. यामध्ये नगरसेवकांच्या काही शिफारशींनुसार सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी भांडवली खर्चातील शंभर कोटी रुपये वळते करून अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पाच लाख रुपयांची तरतूद करून या योजनांची खाती उघडण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने करदात्यांसाठी महामुंबई स्वास्थ्य शिव कवच योजना सुरू करण्याचा अभ्यास करण्यासाठी तरतूद, ज्येष्ठ करण्यात येणार आहे.

नवीन तरतूद व विशेष योजना...
- २३२ नगरसेवकांना अँण्ड्रॉईड मोबाईल देण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद, ६0 लाख रुपयांच्या विकास
निधीमध्ये ४0 लाख रुपयांची भर पडणार आहे. याव्यतिरिक्त नगरसेवकांना विभाग पातळीवर एक कोटीचा निधी विभागून मिळतो.
- पालिका रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत संस्थांमार्फत पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नोकरदार महिलांना दिलासा मिळणार आहे.
- करदात्यांसाठी महामुंबई स्वास्थ्य शिव कवच योजना सुरू करण्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन सुरू करण्याबाबतचे धोरण निश्‍चित करण्यात येणार आहे.
- पालिका शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्याची सोय करण्यात येणार आहे.