ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - परदेशी प्रवासासाठी आवश्यक असणा-या पासपोर्टच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ येत्या १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
पासपोर्ट आणि त्याच्याशी निगडीत अशा अन्य सेवांसाठी लागणारे शुल्क हजार ते दीड हजार रुपयांची वाढ केली आहे. सामान्य कोट्यातल्या पासपोर्टसाठी दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर तात्काळ कोट्यातल्या पासपोर्टसाठी साडेतीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच, विदेशात राहणा-या भारतीय नागरिकांसाठी सुद्घा या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यांना ४० ऐवजी ७५ डॉलर आणि ६० युरो एवढे शुक्ल आकारण्यात आले आहे.

