पीककर्जाला मुहूर्त सापडला

धुळे । दि.11
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे येत्या मंगळवारी, 14 ऑगस्टपासून पीककर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे सीईओ विजय घोणसे पाटील यांनी दिली.
धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून यापूर्वी शनिवारी, 11 ऑगस्टपासून शेतक:यांना पीककर्ज वाटप करण्यात येणार होते. यासंदर्भात शाखेच्या सर्व अधिका:यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याचे काम शनिवारी सायंकाळी उशिरार्पयत सुरू होते. रविवारीही हे काम सुरू राहणार असल्याचे सीईओ विजय घोणसे पाटील यांनी सांगितले.
कजर्मागणीचा वाढता दबाव आणि बँकेकडे उपलब्ध असलेला निधी पाहता बँकेने सन 2011-12 या आर्थिक वर्षात शेतक:यांकडून पीक कर्जापोटी वसूल केलेल्या मुद्दल रकमेच्या 75 टक्के रक्कमेर्पयत कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात बँकेच्या अधिका:यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. मंगळवारपासून सर्व शाखांना कर्ज वाटपासाठी आवश्यक तो पतपुरवठा करण्यात येणार असल्याचे घोणसे पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतक:यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.