ढोलताशांच्या निनादात विसर्जन
नागपूर। दि. २९ (प्रतिनिधी)
गुलालाची मुक्त उधळण, ढोलताशांच्या निनादावर थिरकणारी पावले आणि ‘मोरया, मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात उपराजधानीतील भाविकांनी बाप्पांना उत्साहात पण तेवढय़ाच जड अंत:करणाने निरोप दिला. शहरातील फुटाळा, अंबाझरी, गोरेवाडा, सोनेगाव, गांधीसागर, नाईकतलाव, सक्करदरा आदी तलावांमध्ये तसेच मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये o्रींचे विसर्जन झाले. निर्माल्यामुळे पाणी दूषित होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्या मदतीने महापालिकेने विसर्जन ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी ४४ वाहनांची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त होता.
विदेशी भक्तांचाही बाप्पांना बाय बाय..
बाप्पांना निरोप देण्यासाठी फुटाळा तलावावर विदेशी पाहुणेही पोहचले. गणेश विसर्जनाचा सोहळा त्यांनी डोळ्यात साठवला. अमेरिका येथील अँली व रेबॅका या दोन युवतींनी विसर्जनापासून ते निर्माल्य संकनापर्यंंतच्या कामांना हातभार लावला.
लोकमतशी बोलताना अँली म्हणाली, भारतीय लोकसंस्कृती प्रिय आहे. प्रत्येक उत्सवातून जगण्याचा आनंद ते घेतात, हे पाहून मी भारावून गेले. विसर्जन मिरवणुकीत मीसुद्धा भाग घेतला आणि नाचले. ‘मोरया’ या शब्दाचा अर्थ मला कळला नाही; पण त्याच्या उच्चाराने प्रचंड ऊर्जा मिळत असल्याचा अनुभव मी घेत आहे.
रेबॅका म्हणाली, खरोखरच हा सोहळा पाहून भारतदौर्याचं चीज झालंय. येथे येताना या उत्सवाबाबत माहिती नव्हतं; पण लॉर्ड गणपतीचच मॅजिक असावं की याच काळात आम्ही येथे आलोय. आता यापुढं मी प्रत्येकाला सांगेन आय लाईक गणपती फेस्टिव्हल. खूप मस्त वाटतंय. जाताना मी गणपतीची छोटी मूर्ती घेऊन जाणार आहे गणेशोत्सवाची आठवण म्हणून.
पीओपीचे बाप्पा तरंगले..
तलावाच्या परिसरात सकाळी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिदी नव्हते. त्यामुळे काही भाविकांनी पीओपी मूर्तींंचे तलावातच विसर्जन केले. निर्माल्यसुद्धा पाण्यातच टाकले. त्यामुळे दुपारनंतरच सर्वच तलावांममध्ये पाण्यावर तरंगणारे पीओपीचे बाप्पा दिसत होते. दुपारनंतर स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांंनी भाविकांकडून निर्माल्य गोळा करण्याचे काम सुरू केले. शिवाय पीओपी मूर्तींंचे कृत्रिम टँकमध्येच विसर्जन करायलाही भाग पाडले.
सोनझरीनगरवासीयांनी तयार केल्या ५0 होड्या
गणेश विसर्जनासाठी अर्जुन देहडे यांच्या नेतृत्वात सोनझरीनगरवासीयांनी ५0 होड्या तयार केल्या. या होड्यांच्या मदतीने गणेश विसर्जन केले.
योग संपदाचा नारा
योग संपदाच्यावतीने तलावावर विसर्जनासाठी येणार्या भक्तांना माहितीपत्रक देण्यात येत होते. मेगा फोनच्या माध्यमातून पीओपीच्या मूर्ती कृत्रिम टाक्यांमध्ये टाकण्याचे आवाहन केले जात होते. योग संपदाचे अध्यक्ष दत्तात्रय निंबार्ते, संचालक बाबा शेंडे, गंगाधर पोडल्लीवार, रवींद्र सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.
निर्माल्य संकलनासाठी सरसावले शेकडो हात
दरवर्षी गणेश विसर्जनानंतर तलावात निर्माल्याचा थर साचतो. तो कुजल्यानंतर जलचरांवर विपरीत परिणाम होतो. पाणीही दूषित होते. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात जागृती करून मनपा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी निर्माल्य तलावात टाकू नये, असे आवाहन करीत निर्माल्य संकलन केले. पर्यटनासाठी उपराजधानीत आलेल्या अमेरिकन तरुणींनीही यात हातभार लावला.
ल्ल केंद्रीय विद्यालय, वायुसेनानगर विद्यालयाच्यावतीने पीओपी गणपती विसर्जनासाठी फुटाळा तलाव येथे ‘वॉटर टँक’ तयार करण्यात आली होती. विद्यालयातील शिक्षक ए. जे. राजेंद्रन यांच्या नेतृत्वात शिक्षक किशोर पांजाळे, कंचन सक्सेना, प्रदीप कराडे, एस. एस. सोलंकी व आर. एस. आमरे यांच्यासह ११ विद्यार्थ्यांंनी या उपक्रमात भाग घेतला.
ल्ल ग्रीन व्हिजील : सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहणार्या ग्रीन व्हिजील स्वयंसेवी संस्थेच्यावतीने फुटाळा तलाव येथे पीओपी गणपतींचे तलावात विर्सजन होऊ नये म्हणून प्रत्येक गणपतीची चौकशी केली जात होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात कविता रतन, ऋषाली श्रीरंग, बक्षा बोरकर, सुरभी जयस्वाल, स्नेहा मलातपुरे, आदित्य जोशी, अभिलाषा धोटे, डॉ. अर्चना मेश्राम आदींनी या उपक्रमात भाग घेतला होता.
ल्ल फुटाळा लेबरने केले मनोभावे संकलन: सकाळी काही भाविकांनी तलावातच निर्माल्य टाकले. पोलीस मित्र फुटाळा लेबर या पथकाने तलावात पोहून ते बाहेर काढले. यात संदीप महतो, रितेश चौधरी, राजेश मसराम, संतोष सहारे, कपिल दुर्वे, वीरू यादव, दीपक वाडवे, बबलू दुर्वे, मुकेश यादव आदींचा समावेश होता.
ल्ल सदाबाई रायसोनी कॉलेज : सदाबाई रायसोनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांंनी फुटाळा तलाव परिसरात निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविला. ईशा खुराणा, शलाका गंभीर, चेतना सिंग, प्राची कसबी, शेफाली सावदेकर, अतिभा खान, पूजा सुरोडकर, रितू बोपचे, सायली देशमुख, कल्याणी कानफाडे व रेश्मा पौडवाल यांनी येथे दिवसभर निर्माल्य गोळा करण्याचे काम केले.
ल्ल रोटरी क्लब, नागपूर : रोटरी क्लब, नागपूर आणि उपराजधानीतील सुमारे आठ शाळा-महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी फुटाळा तलाव परिसरात निर्माल्य गोळा करून, गणेशभक्तांना मोफत पाणी पाऊच वाटप करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष अतुल शहा यांच्या नेतृत्वात हिस्लॉप कॉलेज, तुली मॅनेजमेंट कॉलेज, रायसोनी कॉलेज, रामदेवबाबा कॉलेजच्या विद्यार्थ्यांंनी या उपक्रमात भाग घेतला होता.
ल्ल राजेंद्र हायस्कूल : राजेंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंनी फुटाळा तलाव परिसरात वाहतूक व्यवस्था सांभाळण्यात हातभार लावला. शिक्षक विवेक नाहतकर व सुभाष ठवकर यांच्या नेतृत्वात सौम्या चौधरी, साहिल शिंदे, शुभम भोयर, राकेश लाकडे, प्रियेश इंदूलकर आदींनी भाग घेतला.
ल्ल निर्माण संस्था : ज्येष्ठ समाजसेवी डॉ. अभय व राणी बंग यांच्या निर्माण स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी अंबाझरी तलाव परिसरात निर्माल्य गोळा केले. रंजन पांढरे, अपूर्वा गुघे, पल्लवी बापर, रतन कण्णव, प्रीतम शेटे, उमेश जाधव, आकाश, गौरव, स्वाती भागवत आदींनी यात भाग घेतला.
ल्ल अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय : काटोल रोडवरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांंंनी फुटाळा तलाव परिसरात निर्माल्य गोळा करण्याच्या उपक्रमात भाग घेतला. महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर आमले, राजू बुरिले, रवी लोणारे, प्रशांत देशमुख, सुरभी रक्षणकर, भूषण नन्नावरे, अंकुश कामतकर, पौर्णिमा टेकाडे, अपेक्षा पवनकर, भावना टेकाम, सतीश राठोड व शिव कुमार यांनी भाग घेतला .
ल्ल सेंट पॉल शाळा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गद्रे यांच्या मार्गदर्शनात रामराव रेवतकर, राजेंद्र देठे यांच्या नेतृत्वात सेंट पॉल शाळेच्या ३६ विद्यार्थ्यांंनी तलावाच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था सांभाळली.
ल्ल रोड टॅक्स क्लब: सोबतच यशवंतराव गुडधे पाटील, पुरुषोत्तम थोटे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंंनी पीओपीच्या मूर्ती कृत्रिम टाकीत टाकण्यासाठी पुढाकार घेतला.

