अतुल कुलकर्णी। दि. २ (मुंबई)
देशात झालेल्या आजवरच्या हल्ल्यांत जास्तीत जास्त जीवित हानी झाली पाहिजे हा मुख्य हेतू होता. पुण्यात मात्र स्फोटाच्या पद्धतीबरोबरच हेतू देखील सर्वस्वी नवीन आहे. जीवित हानीच्या हेतूविना स्फोट का घडविले, हा प्रश्न सर्व तपास यंत्रणांना छळत आहे.
राज्यातील पोलिसांनी तपासाची त्रिस्तरीय आखणी केली आहे. एटीएस प्रमुख राकेश मारिया काल रात्रीपासून पुण्यात तळ ठोकून आहेत. दिल्लीहूनही एनआयएचे पथक आले आहे. हा सारा तपास तीन हेतूंभोवती फिरत आहे. मुंबई पोलीस, एटीएस यांचे लक्ष इतरत्र वळवायचे व नवीनच काहीतरी करून घातपात घडवून आणण्याचा हेतू यामागे असू शकतो, असेही एका अधिकार्याने ‘लोकमत’ला सांगितले. किंबहुना स्फोटांमध्ये जीवित हानी न झाल्याने त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
या स्फोटाच्या संदर्भात आज गृहमंत्री आर.आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची तब्बल चार तास बैठक झाली. मात्र, कोणताही ठोस निष्कर्ष समोर आला नाही.
या स्फोटांसंदर्भात आता मुंबईत देवेन भारती व पुण्यात पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ हे दोघेच अधिकृतपणे माध्यमांशी बोलतील, असे आर.आर. यांनी स्पष्ट केले.
१) हिंदू आतंकवादी संघटनांचा यात हात आहे का?
या अंगाने कमी धागेदोरे हाती लागलेले आहेत.
२) कतिल सिद्दिकीच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न?
येरवडा जेलमध्ये हत्या झालेला कतिल सिद्दिकी दगडूशेठ गणपतीजवळ स्फोट घडवून आणणार होता. त्याच्या खुनाचा तर बदला नव्हे ना?
३) इंडियन मुजाहिद्दीनचा हा कट होता का?
हात असलाच तर ही पुणे किंवा मुंबईत नियोजित मोठय़ा घातपाताची रंगीत तालीम आहे काय, याचे धागेदोरेही शोधले जात आहेत.
पुणे स्फोटांचा तपास तीन दिशांना
लोकमत – शुक्र, ३ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
१६ तास पूर्वी'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
१८ तास पूर्वीबॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३नक्षलवाद्यांचा उच्छाद
गुरु, १३ जून २०१३अशोक चोप्रा यांच्या निधनाची प्रार्थना सभा
गुरु, १३ जून २०१३

