पुन्हा येतोय 'सत्यमेव जयते'

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५ - आमिर खानने 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेखा, सादरीकरण आणि विषय अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे असल्यामुळे या कार्यक्रमाने भारतीयांच्या मनात घर केले. भारतीय समाजातील समस्यांवर आमिरने आपल्या खास शैलीत भाष्य केले. ते सोडवण्यासाठी आमिर एक पाऊल पुढे आला. आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाचे पहिले पर्व नुकतेच संपले. या कार्यकमाचा आजवरचा प्रवास आणि सत्यमेव जयते टीमचे प्रयत्न 'सत्यमेव जयते का सफर' या कार्यक्रमात १५ ऑगस्ट रोजी प्रसारित केले जाणार आहे.