गेल्या पाच वर्षांतील घर खरेदीला फटका
पुणे। दि. १0 (प्रतिनिधी)
फ्लॅट विक्रीवर एप्रिल २0१0 पासून लागू केलेल्या व्हॅटची पाच वर्षांच्या पूर्वलक्षी प्रभावाने वसुली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने २00६ ते २0१0 या काळात फ्लॅट खरेदी केलेल्यांनाही आता व्हॅट भरावा लागणार आहे.
राज्य शासनास व्हॅट आकारण्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने यासंदर्भात नोटीसही काढण्यात आली आहे. सन २00६ मध्ये व्हॅट कर लागू झाल्यानंतरही २00८ पर्यंत व्हॅट आकारणीसंदर्भात राज्य शासन उदासीनच होते. त्यानंतर जागे झालेल्या शासनाने नोटिसा देऊन व्हॅट आकारणीस सुरुवात केली. याचा सरळ अर्थ असा की शासनाच्या दिरंगाईमुळे आणि लवकर निर्णय न घेण्याच्या क्षमतेमुळेच फ्लॅटधारकांना हा फटका सहन करावा लागणार आहे.
याविरोधात बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या देशपातळीवरील संघटनेने २0१२ मध्येच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गेल्या महिन्यात सुनावणी झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. परिणामी, व्हॅट आकारणीचा निर्णय राज्य शासनाने पुढे रेटला.
मुंबई आणि उपनगरांत २00६ ते २0११ या कालावधीत झालेल्या फ्लॅटची विक्री
(ही संख्या प्रत्यक्षात जास्त आहे. मात्र, अनेक फ्लॅट विक्री न झाल्याने त्यांची नोंदणी झालेली नाही.)
फ्लॅटवर ‘व्हॅट’
लोकमत – शनि, ११ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
५ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
६ तास पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३

