बिग बी वर शुभेच्छांचा वर्षाव

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ११ - बिग बी अमिताभ बच्चन आज आपला ७० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त बिग बींच्या कुटुंबियांनी १० ऑक्टोबरला एक खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बिग बींना सिनेसृष्टीबरोबरच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या खास पार्टीत दिलीपकुमार, सायरा बानो, रजनीकांत, करण जोहर, शशी कपूर, हेमा मालिनी, विनोद खन्‍ना, अरुणा ईराणी, प्राण, जितेंद्र, वहीदा रेहमान, प्रेम चोपड़ा, अजय देवगन, काजोल, जूही चावला, अनिल कपूर, दीपिका पादुकोण, गोविंदा रणधीर कपूर, मौसमी चटर्जी, श्रीदेवी, बोनी कपूर, सुभाष घई, आशुतोष गोवारीकर, बिपाशा बासू, संजय दत्‍त, माधुरी दीक्षित आदी कलाकार उपस्थित होते. याचबरोबर अनिल अंबानी, आदित्‍य गोदरेज, कुमार मंगलम बिर्ला, मुलायम सिंग यादव, अखिलेश यादव, छगन भुजबळ, उद्वव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

तर, काहींनी बिग बींना फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्या दिल्या...

शाहरुख खान - बिग बी आणि जया बच्चन यांच्याबरोबर त्यांच्या गाण्यावर डान्स केला. तसेच त्यांची गाणी ऐकूण मोठा झालो. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांनी पार्टीत केलेल्या आदराबद्दल त्यांचा आभारी आहे.

रमेश शिप्पी - बिग बी यांना मी ४० वर्षापासून ओळखतो. त्यांच्यासोबत माझा पहिला सिनेमा शोले होता, त्यानंतर शान, शक्ती हे ही सिनेमे मी केले आहे, परंतू मला त्यांच्यासोबत अजून काम करायचे आहे.

श्रीदेवी - एखादी कठिण भूमिका करण्यास बिग बी तयार होते, तसे कोणी करायला तयार होत नसे.

प्रियांका चोप्रा - बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मला या आयोजित पार्टीत येता आले नाही.

शबाना आझमी - बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!