बीड - बीडमधून दोन दिवसांपूर्वी उचलण्यात आलेला अब्दुल राफे हा जबियोद्दीन अन्सारीच्या २६/११ च्या मुंबई हल्ला प्रकरणातील प्लॅनचा जिवंत पुरावा असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. सध्या राफे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. अबू जिंदालने २६/११ च्या हल्याच्या आधी सौदीत असताना बीडच्या राफेशी या कटासंबंधी चर्चा केली होती. जिंदालनेच मुंबई क्राईम ब्रँचला हा तपाशील दिला होता.
२६/११ चा प्लॅन मी अब्दुल राफेला सांगितल्याचे जबियोद्दीनने जबाबात म्हटले होते. हा प्लॅन ऐकल्यानंतर मात्र राफेने जबियोद्दीनला मदत करण्यास नकार दिला. तेव्हा जबियोद्दीनने काय काय सांगितले होते आणि नंतर प्रत्यक्ष हल्ल्यावेळी काय काय घडले? याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने राफे हा महत्त्वाचा पुरावा म्हणून मुंबई क्राईम ब्रँचला हवा होता. सध्या राफे याच्यासोबत त्याचा भाऊ आणि एक वकीलही असल्याचे समजते.
बीडचा अब्दुल २६/११चा पुरावा!
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
१३ तास पूर्वीदोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

