शिवाजी गोरे। दि. ११ (लंडन)
पदकांसाठी ऑलिम्पिकच्या मैदानात घमासान सुरू असताना मैदानाबाहेर वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ही स्पर्धा आहे, ब्लेझर किंवा टोप्यांवर लावण्यात येणार्या पिन्सची.
ऑलिम्पिक पार्कच्या बाहेर वेस्टफिल्ड येथे विविध देशांचे सुमारे २५ ते ३0 हौशी कलाकार आपल्याकडील पिन्स घेऊन आहेत. त्याच्यातील काही जणांकडे पहिल्या ऑलिम्पिकपासून ते आताच्या लंडनपर्यंतच्या पिन्स आहेत. चीन, हॉलंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा, र्जमनी, पोलंड, नेदरलँड या देशांतून ते स्वखर्चाने आले आहेत. हे फक्त हौशेखातर असे तेथील ऑस्ट्रेलियाचे अँलन स्टुअर्ड, चीनची झीं ली, नेदरलँडचे अँशले व इतरांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले, ज्याप्रमाणे पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा काही जणांना छंद असतो तसाच हा आमचा छंद आहे. आमच्यातील जे वयस्कर आहेत ते गेल्या ३0 ते ४0 वर्षांपासून प्रत्येक ऑलिम्पिक शहरात जातात. त्यांच्याकडे तुम्हाला सर्वांत जुन्या पिन्स पाहायला मिळतील. ते फक्त अदलाबदली करतात. आम्ही सुद्धा तेच करतो. मग, आम्ही त्यांना नवीन पिन्स देऊन जुन्या घेतो. पण, येथे कोणताही पैशाचा व्यवहार होत नाही. आम्हाला आयोजन समितीकडून येथे थांबण्यासाठी कार्ड दिले जाते.
ब्लेझर पिन्सचा मोठा बाजार
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
४० मिनिटे पूर्वीबॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३नक्षलवाद्यांचा उच्छाद
गुरु, १३ जून २०१३अशोक चोप्रा यांच्या निधनाची प्रार्थना सभा
गुरु, १३ जून २०१३पुन्हा सनी लिऑन
शनि, ८ जून २०१३
