नवी दिल्ली। दि. १९ (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईशान्यच्या नागरिकांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्यासाठी पाकिस्तानातून सुरू असलेल्या नेटवर्किंग साईटसच्या गैरवापराला आळा घालण्याचे भारताचे आवाहन आज पाकिस्तानने धुडकावून लावले. पुरावे द्या, मगच कारवाईबद्दल बोला, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला आहे. दरम्यान, अफवा पसरवणारी संकेतस्थळे तसेच नेटवरची व्यक्तिगत पाने यांच्यावरील बंदीच्या देशव्यापी कारवाईने वेग घेतला आहे.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांच्याशी संपर्क साधला. पाकमधील काही शक्ती हिंसाचाराची बनावट छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटसच्या माध्यमातून प्रसारित करताना अफवांच्या माध्यमातून भारतात जातीय भावना भडकवण्यात असल्याबद्दल चिंता शिंदे यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली.
पाकिस्तान सरकारने मात्र अनुकूल प्रतिसाद देण्याऐवजी कांगावखोर पवित्रा घेतला आहे. अशा आरोपांमुळे दोन्ही देशांतील विश्वासाच्या भावनेला तडा जाईल. पाकिस्तानवर दोषारोप करण्याऐवजी भारताने आपले अंतर्गत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा असे पाकिस्तानतर्फे सांगण्यात आले.
केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी भारतात पसरविण्यात आलेल्या अफवांचे मूळ पाकिस्तानात आहे असे शनिवारी सांगितले होते. पाकमधील भारतविरोधी शक्तींनी तिबेट, थायलंड येथील हिंसाचाराच्या छायाचित्रांवर प्रक्रिया करून ती भारतातील हिंसाचाराची छायाचित्रे आहेत असे भासविण्याचा प्रयत्न ही छायाचित्रे फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर टाकून केला होता. ही सर्व छायाचित्रे व व्हिडिओ बनावट प्रोफाईलद्वारे १३ जुलैपासूनच टाकण्यास सुरुवात झाली होती असे आता लक्षात आले आहे. याखेरीज ईमेल, चॅटिंग, एसएमएस आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकोल (श्डकढ) याद्वारेही अफवा पसरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. ७६ वेबसाईटवर अशा प्रकारची छायाचित्रे आढळून आली.
दरम्यान ईशान्य भारतीयांचे त्यांच्या राज्यात निघून जाण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. शनिवारी बंगलोर येथून ईशान्य भारतात जाणार्या गाड्यांची फक्त ८0 तिकिटे विकली गेल्याने गुवाहाटीकडे जाणार्या सर्व खास गाड्या रद्द करण्यात आल्या.
* आसाममधील हिंसाचारात विदेशी हात असण्याची शक्यता आहे. हा बोडो आणि अल्पसंख्यकांमधील संघर्ष नसून विदेशी शक्ती या हिंसाचारात सहभागी असल्याचे आपणास सुरुवातीपासूनच वाटत होते. केंद्रीय गृहखात्याच्या रिपोर्टमध्येही पाकिस्तानी सहभाग असल्याचे म्हटले आहे.
-तरुण गोगोई, मुख्यमंत्री
भारताच्या मागणीवर पाकचा कांगावा
लोकमत – सोम, २० ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
या क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा
३ तास पूर्वीप्रेमाच्या आड वय न आलेले सेलिब्रिटीज
५ तास पूर्वी'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३
