महागाईत भर!

नवी दिल्ली। दि. २५ (लोकमत न्यूज नेटवर्क)

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पेट्रोल व डिझेल डीलर्सच्या कमिशन वाढीला सरकारने आज हिरवा कंदील दिल्याने पेट्रोल ३0, तर डिझेल १८ पैसे महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भाववाढ आज वा उद्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

सूत्रांनुसार, पेट्रोलवरील कमिशन प्रति लिटर १.४९९ रुपयांवरून १.७९९ रुपये वाढविण्यात आले. डिझेलसाठी ही वाढ ९१ पैशांवरून १.0९ रुपये प्रति लिटर करण्यात आली. ही वाढ कमी असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्सचे सरचिटणीस अजय बन्सल यांनी

म्हटले आहे.