स्नेहा मोरे। दि. १५ (मुंबई)
आपल्याकडे सिनेमाचे फेस्टिव्हल्स होतात. मोठमोठे स्पॉन्सर्स, आयोजक आणि सितारे यांच्या झगमगाटात तो फेस्टिवल आणखी लखाखतो. पण शॉटफिल्मसचे मार्केट आजही आपल्याकडे दुर्लक्षित आहे. काही हौशी मंडळी आजही इंटरनेटवर शॉर्टफिल्मस पाहतात. परंतु त्या शॉर्टफि ल्मसचे फेस्टिव्हल्स खूपच कमी प्रमाणात होताना दिसतात. सोमय्या महाविद्यालयातून बीएमएम झालेल्या अविनाश पवारने असेच एक शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आयोजित केले आहे.
या शॉर्टर्फिल्म फेस्टिव्हलचे नाव आहे, मुंबई इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीव्हल. येत्या २८ आणि २९ ऑगस्ट या दोन दिवसात हा फेस्टिव्हल रविंद्र नाट्य मंदिरात संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये ३0 वर्षाखालील तरूणांच्या शॉर्टर्फिल्मस दाखवल्या जाणार आहेत.
या शॉर्टफिल्म फेस्टीव्हलमध्ये डॉक्यूमेंट्री, अँनिमेशन, म्यूझिक व्हिडीओ, शॉर्टफिल्म, पब्लिक सर्व्हिस अँड अशा विविध माध्यमांत समाविष्ट केलेल्या शॉर्टफिल्मस दाखवल्या जातील. याशिवाय या फेस्टिव्हलचे एक खास आकर्षण असणार आहे. जुन्या आणि गाजलेल्या हिंदी सिनेमांची पोस्टर्स आजच्या पिढीने कुठे पाहिली आहेत.? म्हणूनच शोले, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि अशा बर्याच सिनेमांची पोस्टर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मुंबईतील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने ही आकर्षक पोस्टर तयार करण्यात आली आहेत. आजच्या तरुणपिढीला चित्रपटसृष्टीचा इतिहास माहिती व्हावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘गो ग्रीन’ ही अनोखी संकल्पना ही शॉर्टफिल्म फेस्टीव्हलमध्ये राबविण्यात येणार आहे.
पर्यावरणाशी निगडीत संवर्धनात्मक संदेश देणार्या फिल्मसचा या गटात समावेश असेल. या फेस्टीव्हलसाठी मुंबई, कोलकत्ता, दिल्ली,हैद्राबाद अशा विविध शहरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
तुमचे वय ३0 च्या आत असेल, अआणि तुम्ही जर अशी कोणतीही शॉर्टफिल्म किंवा डॉक्युमेण्टरी तयार केली असेल तर तुम्हीही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकता असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शॉर्टफिल्मस आजही खूप दुर्लक्षित आहेत. त्यांना व्यासपीठ मिळावे या हेतून मी हा शॉर्टर्फिल्म फेस्टिव्हल करण्याचे ठरवले आहे. इंटरनेटवर खूपवेळा प्रेक्षक शॉर्टर्फिल्मस पाहतात. पण अशाप्रकारे जर शॉर्टर्फिल्मस फेस्टिव्हल आयोजित केले गेले तर त्या शॉर्टफिल्मस मेकर्सना चांगली संधी निर्माण होऊ शकते. त्या दिग्दर्शकांनाही त्यांचा प्रेक्षक प्रत्यक्षव भेटतो. त्याचा आनंद वेगळाच असतो.!
- अविनाश पवार, ‘मिस्फ’ शॉर्टफिल्म फेस्टीव्हल आयोजक
‘मिस्फ’ शॉर्ट फिल्म्सचा आनंदसोहळा
लोकमत – गुरु, १६ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
हे शतक हिरकणींचेच
११ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
शनि, १८ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३रणबीरसोबत थिरकली माधुरीची पावले
बुध, १५ मे २०१३
