मुंबईत बंदचा फज्जा !

- देशभरात बंद पुकारलेला असताना दादरची बाजारपेठ गणेशभक्तांनी फुलली होती. राहून गेलेल्या वस्तू, मिठाई, कपड्यांची खरेदी जोरात सुरू होती.

राज्यातही अत्यल्प प्रतिसाद : डिझेल, गॅस आणि एफडीआयच्या विरोधात बिगर कॉँग्रेसी पक्षांनी पुकारलेल्या बंदचा देशाच्या आर्थिक राजधानीत फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशोत्सवाचे कारण देत शिवसेना आणि मनसेने माघार घेतल्याने राज्यातही बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

संमिश्र प्रतिसाद : उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेशात जनजीवन विस्कळीत झाले. इतर राज्यांमध्ये बंदला अंशत: प्रतिसाद मिळाला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

30,000 कोटींचा फटका

भारत बंदमुळे २५ ते ३0 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापार्‍यांच्या प्रमुख संघटनेने केला आहे. असोचेम व सीआयआय या औद्योगिक संघटनांनी हे नुकसान दहा ते साडेबारा हजार कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले आहे.