मूर्ती विटंबना; बसवर दगडफेक

चौसाळा। दि. १४ (वार्ताहर)
येथे मूर्तीची पंधरा दिवसांत मंगळवारी दुसर्‍यांदा विटंबना झाल्याने चौसाळ्यात तीन बसवर दगडफेक करण्यात आली असून काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सुनील केंद्रेेकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकर्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले. व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांचा ही घटना घडल्यामुळे समाजकंटकांचा शोध लाव अशी मागणी गावकर्‍यांनी लावून धरली. औरंगाबाद-सोलापूर, भूम-औरंगाबाद व बीड-सोलापूर बसवर जमावाने दगडफेक केली. याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक कार्यालयातील दंगल नियंत्रण पथक चौसाळा येथे दाखल झाले. सोबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकही होते. आठ दिवसांत तपास लावू असे आश्‍वासन मंडलिक यांनी दिले तेंव्हा तणाव निवळला.
श्‍वान पथकाला पाचारण
पंधरा दिवसांत दुसर्‍यांदा हनुमान मूर्तीची विटंबना झाल्यामुळे मंगळवारी तपास यंत्रणांनी वेग घेतला. येथे श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.