हटके इव्हेंट्सनी गाजला मल्हारचा शेवटचा दिवस
श्रीशा वागळे। दि. १९ (मुंबई)
यूव्ही लाइट, बॉलीवूड डान्स आणि कव्वाली या इव्हेंट्सनी मल्हारचा तिसरा दिवस गाजला. 'पर्दा हैं पर्दा, पर्दे के पिछे पर्दा नशीं हैं', 'पिया हाजी अली पिया हाजी अली', 'ढलता सूरज धीरे धीरे ढलता हैं ढल जाएगा' अशा एकापेक्षा एक कवालींनी तरुणांना पार वेडं करून टाकलं. यूव्ही लाइट डान्स इव्हेंटनं सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडलं...
मल्हारमध्ये पहिल्यांदाच कव्वालीचा इव्हेंट इंट्रोड्युस करण्यात आला होता. कव्वाली स्टाईलनं टाळ्या वाजवत कॉलेजियन्सनी सर्वच परफॉर्मन्सना भरभरून दाद दिली. लाइट सोलो सिंगिंग, कव्वाली, बॉलीवूड डान्स आणि यूव्ही लाइट डान्स हे इव्हेंट्स युथंन फुल टूधम्माल करत एंजॉय केले.
सकाळी पावसामुळे गर्दी थोडी कमी होती, पण दुपारनंतर झेवियर्सबाहेर कॉलेजियन्सच्या रांगा लागायला सुरुवात झाली. रविवारीही गर्दीनं आठ ते दहा हजारांचा आकडा ओलांडला. तीन दिवसांत मल्हारला ३0 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
मिस्टर अँण्ड मिसेस मल्हार, डान्स वर्कशॉप, डेझर्ट मेकिंग वर्कशॉप, कॉमेडी इव्हेंट, ब्राझिलियन मार्शल आर्ट वर्कशॉप या इव्हेंट्सनाही तरुणांनी गर्दी केली होती.
सिंगर शाल्मली खोलगडे सिंगिंग इव्हेंटची जज होती. शाल्मली झेवियर्सचीच विद्यार्थिनी. 'मल्हार'मध्येही ती सहभागी झाली होती. ज्या 'मल्हार'ने मला प्लॅटफॉर्म दिला, त्या मल्हारमध्ये एका इव्हेंटची जज म्हणून यायची संधी मला मिळाली. त्याबद्दल फारच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया शाल्मलीने दिली.
या वर्षीपहिल्यांदाच कव्वालीचा समावेश मल्हारमध्ये करण्यात आलाय. कव्वाली परफॉर्म करताना आम्हाला खूपच मजा आली. आमच्या आठ जणांच्या ग्रुपपैकी कोणीच गाणं शिकलेलं नाही. पण कव्वालीसाठी आम्ही एकत्र आलो आणि महिनाभर प्रॅक्टीस केली. फायनल राउंडसाठी सिलेक्ट झालो, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे भाविक गोयानी या स्पर्धकानं सांगितलं.
यूव्ही लाइट, बॉलीवूड डान्स आणि कव्वाली
लोकमत – सोम, २० ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
५ तास पूर्वीदोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

