मुंबई। दि. १0 (प्रतिनिधी)
राष्ट्रीय पातळीवरील स्वीमिंग चॅम्पियन आणि पेशाने वकील असलेल्या पल्लवी पूरकायस्थ (२५) हिची हत्या वॉचमनच्या विकृत वासनेतून झाल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाले. पल्लवीची हत्या करून काश्मीर, बारामुल्ला येथील मूळगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सज्जाद अहमद अब्दुल सजीज मुगल (२२) या वॉचमनला मुंबई सेंट्रल स्थानकातून अटक करण्यात आली.
तपास आणि आरोपीच्या माहितीवरून पल्लवीची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आल्याचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले. या निर्घृण हत्येसाठी आरोपी सज्जादला मृत्युदंडाचीच शिक्षा होणे अपेक्षित आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील पुरविण्यासाठी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी शासनाकडे विनंती करणार असल्याचे रॉय यांनी सांगितले.
पुण्यातून वकिलीचे शिक्षण घेतलेली पल्लवी आठ महिन्यांपूर्वी वडाळ्याच्या हिमालयन हाईट्स इमारतीच्या १६व्या मजल्यावर राहायला आली. सोबत तिचा मित्र अँड. अविक सेनगुप्ता (२६) हाही राहात होता. पल्लवी तेथे राहायला आल्यापासूनच आरोपी सज्जादचा तिच्यावर डोळा होता. अविक कामानिमित्त पहाटेपर्यंत घराबाहेर राहत असल्याने पल्लवी एकटीच घरी असे. हे समजल्यावर त्याने पल्लवीच्या बलात्काराचा कट आखला. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्याने एक भलामोठा सुरा विकत घेतला होता. तो घेऊनच सज्जाद दीडच्या सुमारास पल्लवीच्या घरात घुसला. चाकूचा धाक दाखवून सज्जादने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा ते पाऊण तास दोघांमध्ये झटापट झाली. अखेर सज्जाद आपल्यावर हावी होत असल्याचे पाहून तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे रागाच्या भरात सज्जादने धारदार सुरा पल्लवीच्या मानेवर फिरवला. हा वार इतका जबरदस्त होता की पल्लवीची संपूर्ण मान त्यात कापली गेली. तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून सज्जादने तेथून पळ काढला. पळताना इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील एका फ्लॅटबाहेरील चपलांच्या बॉक्सखाली सुरा दडवून सज्जाद खाली उतरला. इमारतीच्या प्रवेशद्वारातून न जाता भिंतीवरून उडी मारून तो सटकला. दिवसभर अँन्टॉपहिल परिसरातच भटकून काही ओळखीतल्या व्यक्तींकडून त्याने काश्मीर गाठण्यासाठी पैसे गोळा केले. संध्याकाळी तो ट्रेन पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर उभा होता. तोपर्यंत सहायक आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार्या अधिकार्यांना सज्जादच आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्याची झटपट माहिती काढून एपीआय महेश तावडे यांनी त्याला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. काल रात्रीच पल्लवीचे आयएएस वडील अथनू कायस्थ मुंबईत आले. येताच त्यांनी सायन रुग्णालयातून पल्लवीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कारही उरकून ते पुन्हा दिल्लीला रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
मूळचा काश्मीरच्या बारामुल्ला गावचा रहिवासी असेला सज्जाद पोटापाण्यासाठी २00९मध्ये मुंबईत आला. महिनाभर तारापूरमध्ये काम केल्यानंतर ओळखीतून तो ए.एच. एंटरप्रायझेस या सिक्युरीटी एजन्सीमध्ये कामाला लागला. या एजन्सीतर्फे तो पल्लवी भाड्याने राहत असलेल्या वडाळ्याच्या हिमालयन हाईट्स इमारतीत गेल्या अडीच वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता.
अशी झाली अटक..
पल्लवीच्या शेजार्यांच्या घराच्या डोअरबेलवर रक्त लागलेले पोलिसांना आढळले. त्यावरून तिने जखमी अवस्थेत बचावासाठी शेजार्यांची बेल वाजवल्याची शक्यता होती. मात्र, मध्यरात्री शेजार्यांनी बेल ऐकलेली नाही. साडेपाचच्या सुमारास अविक घरी परतला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला.
वडील अतनु पुरकायस्थ हे १९८४च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय कृषि मंत्रालयात सहसचिव आहेत. तिची आई सुमिता भारत संचार निगमच्या अंतर्गत लेखा परीक्षण विभागात उप महासंचालक आहे.
- सुरुवातीला गुन्हे शाखेला इलेक्ट्रेशियनवर संशय होता. मात्र, चौकशी आणि त्याच्या फोनरेकॉर्डवरून तो या गुन्ह्यात सहभागी
नाही हे स्पष्ट झाले.
- रात्रपाळीला असलेला सज्जाद गायब असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्याची माहिती, फोटो मिळविण्यात आला. मोबाइल रेकॉर्डवरून त्याला मुंबई सेंट्रल येथून ताब्यात घेण्यात आले.
- सज्जादने खोटे नाव व पत्ता देऊन ए.एच. एंटरप्रायझेस या सिक्युरीटी एजन्सीची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. बोरीवलीला या एजन्सीचे कार्यालय आहे. त्याने आपले नाव सज्जाद पठाण तर पत्ता लालचौक, o्रीनगर असा लिहिल्याचे आढळले.
सज्जादनेच घालवली लाईट
१. हत्येपूर्वी रात्री ११च्या सुमारास पल्लवी कामावरून घरी आली तेव्हा लाईट गेल्याचे तिला समजले. तिने इंटरकॉमवरून सुरक्षारक्षकाला याची माहिती देण्यासाठी इंटरकॉम उचलला तर तोही बंद होता.
२. म्हणून तिने बीबीएमवरून अविकशी संपर्क साधला. त्याने दिलेल्या सल्लय़ानुसार खासगी इलेक्ट्रेशियनला बोलावले. तो माघारी फिरताच पुन्हा लाईट गेली. म्हणून पल्लवीने पुन्हा त्याला बोलावून घेतले.
३. त्याने पुन्हा डागडुजी केली आणि माघारी फिरला. या वेळी त्याने एसी, फ्रीज, अन्य जादा वीज खेचणारी उपकरणे बंद ठेवून पंखाच सुरू
ठेवण्याचा सल्ला दिला.
४. दोन्ही वेळेस इलेक्ट्रीशियनसोबत सज्जाद पल्लवीच्या घरात आला. त्याने डागडुजीत मदतही केली. प्रत्यक्षात मात्र पल्लवीच्या घरची लाईट सज्जादनेच घालवली होती.
५. इलेक्ट्रीशियनला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने पल्लवीचा विश्वास जिंकला आणि तिची नजर चुकवून दरवाजाजवळील रॅकमधील घराची चावी चोरली.
६. घरची चावी कुठे असते ते त्याला नेमके ठाऊक होते. याच चावीचा वापर करून सज्जाद दीडच्या सुमारास पल्लवीच्या घरात शिरला.
वकिलाचा बळी घेणारा वासनांध वॉचमन !
लोकमत – शनि, ११ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
आगामी...इश्क इन पॅरिस
१९ तास पूर्वीगजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३रणबीरसोबत थिरकली माधुरीची पावले
बुध, १५ मे २०१३हॅपी बर्थ डे डिअर माधुरी...!!
मंगळ, १४ मे २०१३

