विक्रीच्या मार्‍याने पडझड; २२९ अंकांनी घसरण

मुंबई। दि. ८ (प्रतिनिधी)

युरोपीय शेअर बाजारातील मंदी आणि गुंतवणूकदारांनी बड्या कंपन्यांच्या शेअर्सची मोठय़ा प्रमाणावर विक्री केल्याने भारतीय शेअर बाजारात चांगलीच पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २२९.४८ अंकांनी कोसळत गेल्या १0 दिवसांतील नीचांक पातळीवर आला.

वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी महागाईला लगाम घालणे तसेच निगरुंतवणुकीची प्रक्रिया गतिमान करण्यासोबत वित्तीय स्थिती भक्कम करण्यासाठी योजना तयार करण्याची घोषणा केल्यानंतरही बाजारावर त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. आज सलग दुसर्‍या दिवशी बाजारात घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच कमकुवत झाली. बांधकाम, तेल आणि वायू, भांडवली सामान आणि टिकाऊ वस्तू कंपन्यांचे शेअर्स गडगडल्याने निर्देशांक दिवसअखेर १८,७0८.९८ वर आला.