जोहान्सबर्ग। दि. १३ (वृत्तसंस्था)
२0१0 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवून देणार्या कर्णधार धोनीला रविवारी होणार्या सिडनी सिक्सर्सविरुद्ध पहिल्या सामन्यात धडाकेबाज विजयासह नेतृत्वकौशल्य सिद्ध करण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे.
चॅम्पियन्स लीग टष्द्वेंटी-२0 च्या ‘ब’ गटातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात रविवारी जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जला इंडियन प्रीमियर लीगमध्ये तीनदा आणि चॅम्पियन्स लीगमध्ये २0१0 मध्ये विजेतेपद मिळवून देणार्या धोनीवर आता मोठी जबाबदारी आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाच्या कामगिरीचा विचार करता त्याने २0१२ च्या आयपीएल स्पर्धेत १९ सामन्यांतील १८ डावांत ४४१ धावा केल्या होत्या. त्यात त्याची ७३ ही सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय मुरलीने १४ सामन्यांत ३३६ धावा केल्या आहेत. त्यात त्याची ११३ धावांची खेळी संस्मरणीय ठरली आहे. एस. बद्रीनाथने १५ सामन्यांतील ९ डावांत १९६, रवींद्र जडेजाने १९ सामन्यांतील १४ डावांत १९१ आणि कर्णधार धोनीने १९ सामन्यांतील १७ डावांत एकूण ३५७ धावा फटकावल्या आहेत.
याशिवाय चेन्नईकडे आर. अश्विन आणि अष्टपैलू जडेजाच्या रूपाने जबरदस्त गोलंदाज आहेत. अश्विनने या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये १८ सामन्यांत १४ गडी बाद केले आहेत, तर अष्टपैलू जडेजाने १९ लढतींमध्ये १२ बळी घेतले आहेत. चेन्नईच्या संघात भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा चांगला ताळमेळ आहे.
त्याचप्रमाणे घरच्या मैदानावर खेळण्याचा प्लेसीसला आणि संघालाही फायदा होईल. त्यामुळे चेन्नईचे पारडे जड वाटते.

