ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ४ - संगीत क्षेत्रातील एक महत्वाचा कार्यक्रम असमा-या इंडियन आयडॉल ६ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आणि या पर्वाचा विजेता ठरला पंजाब दा पुत्तर विपुल मेहता... आपले प्रतिस्पर्धी अमित कुमार आणि देवेंद्र पाल यांना नमवून विपुलने हे विजेतेपद पटकावले. अभिनेत्री करीना कपूरच्या हस्ते विपुलने ट्रॉफी स्वीकारली. या विजेतेपदाबरोबर विपुलला ५0 लाख रुपये, एक कार व बाईक बक्षिस मिळाली असून लवकरच त्याला एका अल्बम व चित्रपटात पार्श्वगायन करण्याची संधी मिळणार आहे.
इंडियन आयडॉलच्या ग्रँड फिनालेला अनु मलिक, सलीम मर्चंट, सुनिधी चौहान आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले हे परीक्षक तर उपस्थित होतेच. त्याचबरोबर बर्फी चित्रपटातील कलाकार रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा व इलियाना डिक्रूझ आणि हिरॉईन चित्रपटाचा दिग्दर्शक मधुर भांडारकर व करीना कपूर उपस्थित होते.

