अलिबाग।
दि. १५ (विशेष प्रतिनिधी)
कारगील युध्दात शहीद झालेल्या पोलादपूर तालुक्यातील कोंढवी येथील शहीद लक्ष्मण महादेव निकम यांच्या वीरपत्नी संगीता लक्ष्मण निकम यांच्या नावे पोलादपूर ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रातील दीड गुंठय़ाचा एक भूखंड करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी वीरपत्नी निकम यांना भूखंडाची कागदपत्रे तयार करण्यात आली. परंतु केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे शासकीय दुखवट्यामुळे आज कागदपत्रे प्रदान करता आला
नाहीत. सोमवार २0 ऑगस्टला जिल्हाधिकारी जावळे पोलादपूरला जाऊन निकम यांना हा भूखंड प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जगन्नाथ वीरकर यांनी दिली आहे. शासकीय कामकाजातील त्रुटी लोकमतने लक्षात आणून दिल्यानेच ही प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्याचे जावळे यांनी सांगितले.
१५ ऑगस्टला माझे शहीद पती लक्ष्मण निकम यांच्या कोंढवी येथील स्मारका जवळ आम्ही स्वातंत्र्यदिन आयोजित करतो. त्याच दिवशी आमच्या कुटुंबास जिल्हाधिकार्यांनी भूखंड मंजूर करुन, खर्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- संगीता लक्ष्मण निकम, वीरपत्नी
वीरपत्नीच्या नावे सरकारी भूखंड
लोकमत – गुरु, १६ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
३ तास पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
४ तास पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३
