सखीच्या ‘मुखपृष्ठा’वर समजा तुमचाच फोटो झळकला तर.? काय म्हणता विश्वास नाही बसत.? सखीच्या मुखपृष्ठावर फोटो छापून यायला आपण कुठे ‘मॉडेल’ आहोत?
- असं वाटणं साहजिक आहे, पण विश्वास ठेवा. सखीच्या मुखपृष्ठावर तुमचाही फोटो झळकू शकतो. त्यासाठी तुमचा प्रसन्न-हसरा असा छानसा फोटो फक्त तुम्ही आम्हाला सखीच्या पत्त्यावर पाठवायचा. आणि वाट पाहायची तो फोटो छापून येऊन आपण महाराष्ट्रासह-गोव्यातही फेमस होण्याची.!
त्यासाठी तुम्ही एवढंच करायचं.
१) तुमचा एक छान-प्रसन्न-प्रोफेशनली शूट केलेला फोटो सखीला पाठवायचा.
२) फोटोची प्रिंट पाठवणार असाल तर ती ८ बाय १२ या साईजमध्येच असावी.
३) फोटो ईमेल करणार असाल तर ६ मेगापिक्सेल (म्हणजेच २८१६ x २११२ पिक्सल) याच साईजमध्ये तो असायला हवा.
मात्र हे लक्षात ठेवा :
१) मोबाईलवरून काढलेले फोटो स्वीकारले जाणार नाहीत.
२) प्रसिद्ध केलेले अथवा न केलेले फोटो परत पाठवले जाणार नाहीत.
३) फोटो निवडीचा अंतिम अधिकार संपादक मंडळाचा असेल, त्याबाबत फोनवरून कसलीही चौकशी-आग्रह-विनंती करू नये.
पत्ता :
संयोजक, सखी, पुरवणी विभाग, ‘लोकमत भवन’,
बी-३, एमआयडीसी, अंबड. नाशिक - ४२२ 0१0.
ईमेल : lokmatsakhi@gmail.com

