सहा अंपायर फिक्सिंगला तयार

स्टिंग ऑपरेशनने उलगडले ‘ऑपरेशन वर्ल्ड कप’चे रहस्य

नवी दिल्ली। दि. ८ (वृत्तसंस्था)

केवळ खेळाडूच फिक्सिंग करून पैसे कमावतो असे नाही, तर ज्यांचा निर्णय अंतिम मानला जातो, ते पंचही फिक्सिंग करू शकतात, अशी धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली आहे. पाकिस्तानचे नदिम घाऊरी व अनिस सिद्धीकी, बांगलादेशचे नादीर शहा व o्रीलंकेचे गामिनी दिस्सानायके, मौरीस विन्स्टन आणि सागरा गालाडे हे सहा अंपायर फिक्सींगला तयार होते.

असे झाले स्टिंग ऑपरेशन

१कोणतेही सामने मी फिक्स करू शकतो, असे बांगलादेशचे अंपायर नादिर शाह यांनी सांगितले. फलंदाजाला बाद किंवा नाबाद देण्यासही ते तयार होते. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये फिक्सिंग झाले होते. यातील काही सामन्यांत पाकिस्तानचा सलामीवीर नासिर जमशेद याने फिक्सिंग केले होते. देशाला जिंकवण्यास बांगलादेशचे अंपायर सदैव तयार असतात, असेही ते म्हणाले.

२o्रीलंकन प्रीमिअर पॅनल अंपायर सागरा गालाडे यांनी टी-२0 वर्ल्डकप सामन्यात चौथ्या अंपायरची भूमिका पार पाडली होती. या लढतीत केवळ ५0 हजारांसाठी पिच रिपोर्ट, हवामानाचा अंदाज, नाणेफेक आणि दोन्ही संघांच्या अंतिम ११ जणांच्या नावांत फेरफार करण्याचे मान्य केले होते. गालाडे यांनी पाक फलंदाज इमरान नाझीरला नाबाद असतानाही बाद देण्याचे कबूल केले होते.

३पाकिस्तानचे आयसीसी पॅनलवरील अंपायर नदीम घाऊरी यानेही भारतीय संघाला कोणत्याही पद्धतीने सहकार्य करण्याचे मान्य केले होते. नदीम याने ४३ वन-डे, १४ टेस्ट आणि ४ टी-२0 अंपायरिंग केली आहे.

४या फिक्सिंगसाठी सागरा गालाडे याने o्रीलंकेचे अंपायर मौरीस विन्स्टन याचे नाव सुचवले होते. पिच रिपोर्ट, हवामानाचा अंदाज, नाणेफेक यात बदल करण्यासाठी त्याने ५0 हजारांची लाच मागितली होती.

स्टिंग ऑपरेशनची सत्यता तपासायची असल्यास आयसीसी, बीसीसीआयसह कुठल्याही चौकशी

करणार्‍या यंत्रणेला आपण हे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देऊ, त्यातून त्याची सत्यता प्रस्थापित होईल.

- रजत शर्मा, एडिटर इन चीफ व चेअरमन, इंडिया टीव्ही

नादिर शाह यांनी ४0हून अधिक वन-डे, सहा टेस्ट सामन्यांत टीव्ही अंपायर म्हणून काम पाहिले आहे.

अंपायर नदीम घाऊरी यानेही भारतीय संघाला सहकार्य करण्याचे मान्य केले होते.