सातारा। दि. १५ (प्रतिनिधी)
साधुवाण्याच्या गोष्टी सांगणारी सत्यनारायण पूजा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीत घालण्याचा प्रकार वादात अडकला आहे. शासकीय वास्तूत पूजेचा प्रकार धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला तिलांजली देणारा असल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ‘प्रवर्तन’ संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वानी एन. यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य इमारतीच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) कार्यालयात मंगळवार, १४ रोजी सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कर्मचार्यांनी वर्गणी काढून सत्यनारायण पूजा आणि प्रसादाचे आयोजन केले होते. पूजेमुळे ‘डीआरडीए’च्या कार्यालयात दिवसभर उत्सवाचे वातावरण होते. रांगोळी काढण्यात आली होती, तसेच प्रवेशद्वारावर केळीचे खुंट लावण्यात आले होते. दिवसभरात शेकडो कर्मचार्यांनी तीर्थप्रसाद घेतला.
दरम्यान, प्रवर्तन संस्थेचे अध्यक्ष अरुण जावळे यांनी या पूजेवर जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवला आहे.
निवेदनात म्हटले आहे की. ‘भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. म्हणून शासनाच्या मालमत्तेत पूजाअर्चा, धार्मिक विधी करता येत नाहीत. ही तत्त्वे ग्रामीण विकास यंत्रणेत पायदळी तुडवली असल्याने त्यांच्यावर घटनाद्रोहाची कारवाई करावी,’ अशी मागणीही ‘प्रवर्तन’चे अध्यक्ष अरुण जावळे यांनी केली आहे.
सत्यनारायण पूजेसंबंधीची तक्रार प्राप्त झाली आहे. ती चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शाम देशपांडे यांच्याकडे पाठवली आहे.
— डॉ. रामास्वामी एन. (जिल्हाधिकारी, सातारा)
साधुवाण्याचं जहाज ‘वादळात’ अडकलं!
लोकमत – गुरु, १६ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
गुरु, २३ मे २०१३दोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३

