सांगली।
दि. 18 (प्रतिनिधी)
सायकल रिपेअरी दुकानदारांच्या मेळाव्यात सायकल पंरला दहा, तर ओव्हरऑईलिंगला दोनशे रुपये दर निश्चित केला़ संघटनेच्या पदाधिकार्यांनी मेळाव्यात हे दर जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी केली आह़े
सायकल रिपेअरी दुकानदारांचा सांगलीत मेळावा झाला़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अॅड़् क़े डी़ शिंदे, विकास मगदूम, शिवाजी त्रिमुके, जनार्दन गोंधळे आदी होत़े या मेळाव्यात सायकल ते मोटारसायकल पंर, ऑईलबदली आदींचे ठरविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली़ सायकल पंर काढण्यासाठी दहा रुपये, तर मोटारसायकल तीस रुपये, ओव्हरऑईलिंग करण्यासाठी शहरात दोनशे, तर ग्रामीण भागामध्ये दीडशे रुपये दर निश्चित केला़ यासह किरकोळ दुरुस्तीचे दरही या मेळाव्यात निश्चित करण्यात आल़े तसेच 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्या जनता दलाच्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व सायकल दुकानदारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला़
सायकल रिपेअरीचे दर निश्चित
लोकमत – रवि, १९ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
या क्रिकेटपटूंना ओळखून दाखवा
११ तास पूर्वीप्रेमाच्या आड वय न आलेले सेलिब्रिटीज
१३ तास पूर्वी'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३
