ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १७ - डिझेलच्या दरवाढीसोबतच स्वयंपाकासाठी लागणा-या सबसिडीप्राप्त गॅस सिलेंडरची मर्यादा वर्षाला सहा करण्याच्या निर्णयावर तृणमूल काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर ही मर्यादा १०पर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस असल्याचे कळते.
सरकारने ही भाववाढ मागे न घेतल्यास केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने सरकारमधील आपल्या मंत्र्यांचे राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात पक्षाची भूमिका मंगळवारी नक्की होईल, असे रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी सांगितले.
