- रझा अकादमीचे हिंसक आंदोलन; २ ठार, ४५ पोलिसांसह ५५ जखमी
मुंबई। दि. ११ (प्रतिनिधी)
आसाम आणि म्यानमारमधील दंगलींचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानावर जमलेला जमावच आज दंगलखोर बनला. जाळपोळ, तोडफोड करीत या जमावाने थेट सीएसटीवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. लाठीमार, हवेत गोळीबार करूनही हा जमाव नियंत्रणात आला नाही. उलट जमावाच्या हिंसाचारात दोघांचा बळी गेला तर ४५ पोलिसांसह ५५ जण जखमी झाले.
रझा अकादमीच्या नेतृत्वाखाली ५0 हजार आंदोलक आझाद मैदानात जमले होते. आसाम दंगल जगासमोर योग्य पद्धतीने येत नसल्याचे सांगत दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलकांनी भाषणांतून मीडियावर हल्ला चढविला. हे ऐकून आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी कव्हरेज करणार्या प्रसारमाध्यमांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा जमाव पुढे हिंसक होत मीडियाच्या गाड्यांवरच तुटून पडला. कर्मचार्यांना बाहेर काढून वाहनांना आग लावत हा जमाव सीएसटीकडे निघाला. अटकाव करणार्या पोलिसांवरही दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षक पद्माकर जुईकर गंभीर जखमी झाले. शिवाय जमावाने बेस्टच्या बसेस थांबवून दगड, काठय़ांनी काचा फोडल्या. पालिकेचे प्रवेशद्वार, आजूबाजूच्या इमारतींनाही लक्ष्य केले. बेलगाम जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जाळपोळ, तोडफोड करीत जे.जे. उड्डाणपुलावरून येत असलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. जमाव थेट सीएसटीत घुसू पाहत होता. त्याला स्थानकाच्या बाहेरच थोपविण्यात पोलिसांना यश आले. अन्यथा, सीएसटीच्या प्लॅटफॉर्मवर ही दंगल पोहोचली असती.
हिंसाचार भडकताच परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली. ‘लोकल’ने जमावाचे आणखी लोंढे सीएसटीकडे येत असल्याचे लक्षात येताच लोकल सेवा थांबविण्यात आली. सीएसटी परिसर आणि आझाद मैदानासमोर प्रवेश बंद करण्यात आला. अखेर पाचच्या सुमारास दंगलखोरांवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले.
रझा अकादमीचे हात वर...
आंदोलकांतील काही जण अचानक आक्रमक झाले. निषेधासाठी आम्ही जमलो होतो. आमचा या हिंसेला पाठिंबा नसल्याचे सांगत आंदोलन पुकारणारे रझा अकादमीचे मुख्य सचिव मोहंमद सईद यांनी हिंसाचाराबाबत हात वर केले.
60वाहनांचे नुकसान;सात वाहने जाळली...
हिंसक आंदोलकांनी सीएसटी व आझाद मैदान परिसरातील सुमारे ६0 वाहनांचे नुकसान केले. या आंदोलकांनी पीसेव्हन न्यूज, न्यूज२४ आणि एबीपी माझा या वृत वाहिन्यांच्या ओबी व्हॅन, पोलिसांची एक गाडी तसेच पाच मोटारसायकली जाळल्या. तसेच ४९ बेस्ट बसेसची तोडफोड केली.
वाहतूक व लोकलचा बोजवारा...
हिंसक आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीसह लोकल सेवेचा बोजवारा उडाला. जे.जे. उड्डाणपूलही बंद करण्यात आला होता. दोन तास हार्बर लोकल सेवा बंद करण्यात आल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला. त्यामुळे दादर, भायखळा आणि सीएसटी स्थानकांवर गर्दी झाली होती.
मुंबई,ठाण्यात अँलर्ट...
मुंबईसह ठाण्यातही अँलर्ट जारी करण्यात आला. ठाण्यात मोहल्ला कमिटीच्या बैठकाही घेण्यात आल्या. राबोडी, मुंब्रा, हाजुरीसह कल्याणमधील बैलबाजार, वल्लीपीर, पारनाका, दूधनाका, नेतिवली, पत्रीपूल, रामबाग या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेकडे तपास...
आंदोलकांनी जाळपोळ आणि तोडफोड करताना शस्त्रास्त्रांचा वापर केला असण्याची शक्यता आहे. हा जमाव तोडफोडीच्या उद्देशाने आला होता का, याचा तपास गुन्हे शाखेला देण्यात आला असल्याची
माहिती पोलीस आयुक्त अरुप पटनायक
यांनी दिली.
सीएसटीला जाळपोळ !
लोकमत – रवि, १२ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
१ तास २३ मिनिटे पूर्वीआगामी...इश्क इन पॅरिस
२ तास १६ मिनिटे पूर्वीहे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३गजाआड गेलेले सेलिब्रिटीज
शुक्र, १७ मे २०१३क्रिकेटचे धर्मद्रोही
गुरु, १६ मे २०१३

