नाशिक । दि. ९ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या स्कूलबससाठी शासनाने मोटार वाहन अधिनियमात काही बदल करून नवीन नियमावली जाहीर केली असून, त्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच बसचालक, मालकांनाही काही निर्बंध घालून देण्यात आले आहेत. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूलबस वीस वर्षांपेक्षा जास्त जुनी असता कामा नये, अग्निशमन उपकरणे अशी सक्तीही करण्यात आली आहे.
नियमावलीतील वैशिष्ट्ये
विद्यार्थी वाहतुकीसाठी चार चाकी हलक्या मोटार वाहनांचा वापर व्हावा.
परिवहन आयुक्तांनी मान्यता दिलेली आसन व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था असावी.
टणक छत व बंदिस्त प्रवासी कक्षांनी युक्त असलेल्या तीन चाकी ऑटोरिक्षाही विद्यार्थी वाहतूक करू शकतील.
बसमध्ये चालकाव्यतिरिक्त सहवर्ती (क्लिनर) बंधनकारक; परंतु बारा पर्यंत आसन क्षमता असलेल्या स्कूलबसला सहवर्तीची गरज नाही. त्याची कामे चालकाने पार पाडावीत.
स्कूलबसच्या प्रवेशद्वाराच्या सर्वांत खालच्या पायरीची उंची जमिनीपासून ३00 मिलिमीटरपेक्षा अधिक नसावी. सर्व पायर्या न घसरणार्या असाव्यात.
स्कूलबसच्या पायरीची उंची ३५0 मिलिमीटरपेक्षा जास्त असेल तर अशा बसमध्ये एक अतिरिक्त पायरी बसवावी.
बसमध्ये सर्व प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा अंतर्भाव असलेली प्रथमोपचार पेटी बसविणे अनिवार्य.
आय.एस.आय. मार्क असलेली अग्निशमन उपकरण चालकाच्या आसनाजवळ व आपत्कालीन कक्षाजवळ असणे सक्तीचे.
आसनाखालील जागेचा वापर दप्तरे ठेवण्यासाठी करावा व त्यासाठी आसनाजवळ आडवा रॉड बसविण्यात यावा जेणेकरून ब्रेक दाबल्यास दप्तरे पुढे जाणार नाहीत.
विद्यार्थी वाहतूक करणार्या बसवर ‘स्कूलबस’ व त्यावर शाळेत जाणार्या मुलांचे चित्र (एक मुलगा व एक मुलगी) असावे.
स्कूलबसमधील अंतर्गत सुरक्षिततेचे
नियम
नाशिक- विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसेसच्या अपघातांच्या घटना लक्षात घेता बसेसमधील विद्यार्थ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन शासनाने नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये बसच्या अंतर्गत सुरक्षिततेची देखील काळजी घेण्यात आली आहे.
स्कूलबसची नियमावली जाहीर
लोकमत – शुक्र, १० ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
'कुणी घर देता का घर' म्युझिक लाँच
२३ तास पूर्वी'प्रेमसूत्र' चित्रपटाचे म्युझिक लाँच
मंगळ, १८ जून २०१३बॉलिवूडचा मान्सून रोमान्स
शुक्र, १४ जून २०१३नक्षलवाद्यांचा उच्छाद
गुरु, १३ जून २०१३अशोक चोप्रा यांच्या निधनाची प्रार्थना सभा
गुरु, १३ जून २०१३
