स्टेट बँकेच्या नफ्यात १३७% वाढ!

कर्जवसुली मात्र चिंताजनक, थकीत कर्जाची रक्कम २0,३२४ कोटी रुपये

मुंबई। दि.१0 (प्रतिनिधी)
३0 जून २0१२ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच अवधीच्या तुलनेत स्टेट बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा १३७ टक्क्यांनी वाढून ३,७५२ कोटी रुपयांवर गेला; मात्र बँकेच्या थकीत कर्जवसुलीचे प्रमाण चिंताजनक आहे.
बँकेने २0११-१२ च्या एप्रिल-जून तिमाहीत १५८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. याच तिमाहीत ग्राहकांतील थकीत कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या २.२२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वित्तीय वर्षात याच अवधीत हे प्रमाण १.६१ टक्के होते.
थकीत कर्जाचे वाढते प्रमाण पाहता बँकेच्या कर्ज व्यवसायावर आर्थिक मंदीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. ३0 जून २0१२ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न १६.८९ टक्क्यांनी वाढून ३२,४१५ कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वित्तीत वर्षात
याच अवधीत ते २७,७३२ कोटी रुपये होते. या तिमाही परिणामानंतर शेअर बाजारात स्टेट बँकेचा शेअर ४ टक्क्यांनी घसरला.