हमीद अन्सारींचा शपथविधी

नवी दिल्ली। दि. ११ (वृत्तसंस्था)
हमीद अन्सारी यांनी आज उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. ते देशाचे चौदावे उपराष्ट्रपती बनले आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग दुसर्‍यांदा उपराष्ट्रपती बनणारे ते दुसरे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनाच्या ऐतिहासिक अशोका हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली. ७५ वर्षीय अन्सारींनी इंग्रजीतून शपथ घेतली. नुकत्याच उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अन्सारी यांनी रालोआ उमेदवार जसवंत सिंह यांचा पराभव केला होता.