अहमदनगर

ताज्या बातम्या

  • शिर्डी: समाधी मंदिरा समोरील सभामंडपाच्या प्रवेशद्वारातच हार-फुले स्वीकारून भाविकांचे दर्शन सुकर करण्यासंदर्भांत व्यवस्थापनाने वारंवार निर्णय घेवूनही अंमलबजावणी मात्र झालेली नाही. त्यातच गर्दीच्या काळात साईमंदिरात भाविकांना साईंच्या ऐवजी समाधीच्या चौथर्‍यावरील पुजार्‍यांचेच दर्शन घडत असल्याने समाधीवरील पुजार्‍यांचा वावर कमी करण्याचीही आवश्यकता आहे.

  • चिमुकलीसह एक ठार लोकमत - ५ तास पूर्वी

    पारनेर : जीपचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने समोर उभ्या असलेल्या टेम्पोंवर जीप आदळून झालेल्या अपघातात सहा वर्षाच्या चिमुकलीसह एक वृद्ध ठार झाला. तर तीन जण जखमी झाल्याची घटना नगर-कल्याण महामार्गावर कर्जुले हर्यानजीक शनिवार (दि.२५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

  • दूध दरवाढीने आधार लोकमत - ५ तास पूर्वी

    देवदैठण: राज्य सरकारने दुधाच्या खरेदी दरात वाढ केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण परिसरातील दूध उत्पादक शेतकर्‍याला काही प्रमाणात आधार मिळाला आहे. गाईच्या दुधाचा खरेदीदर १ रुपया ५0 पैसे तर म्हशीच्या दुधाचा खरेदीदर २ रुपये ५0 पैसे वाढवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ३.५ डीग्रीला आता नवीन दराने पैसे मिळणार आहे.

  • अशोक निंबाळकर ल्ल अहमदनगर
    शिक्षणात तीन वर्षांचा खंड पडला असेल तरच बहिस्थ म्हणून प्रवेश घेता येईल. आणि त्यासाठी मोजावे लागतील तब्बल आठ हजार रूपये. बहिस्थ प्रवेशासाठी पुणे विद्यापीठाची ही नवीन नियमावली येऊ घातलीय. येत्या आठ-दहा दिवसांत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा विद्यापीठातील लाखो बहिस्थ विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.

  • अहमदनगर: जावेद शेख या पोलीस कर्मचार्‍याच्या आत्महत्येचे कारण अजूनही पोलिसांना सापडलेले नाही. त्यांचे कुटुंबिय, मित्रांकडून पोलिसांनी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे यांनी दिली.

  • अहमदनगर: बहिस्थ विद्यार्थ्यांबाबत पुणे विद्यापीठ कडक नियम करण्याच्या तयारीत असल्याने विविध माध्यमातून टीका होत आहे. मात्र, बहिस्थ विद्यार्थी महाविद्यालयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने विद्यापीठाला ऐनवेळी केंद्रांची शोधाशोध करावी लागली.

  • उंबर्‍यात रास्तारोको लोकमत - ५ तास पूर्वी

    राहुरी : गेल्या २७ दिवसांपूर्वी जळालेले रोहित्र महावितरणने दुरूस्त न केल्याने संतप्त झालेल्या उंबरे येथील ग्रामस्थांनी राहुरी-उंबरे रस्त्यावर एक तास रास्तारोको आंदोलन केले. चोवीस तासात रोहित्र सुरु करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

  • दोन गटात हाणामारी लोकमत - ५ तास पूर्वी

    जामखेड : वहिवाटीच्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये काठी, लाकडी दांडक्याचा वापर झाला. या हाणामारीत दोघेजण जखमी झाले असून तिघा जणांना अटक करण्यात आली. जामखेड तालुक्यातील नान्नज येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

  • जावई-सासरे अन् आरोपी तिसरे ! लोकमत - ५ तास पूर्वी

    अहमदनगर: जावई-सासर्‍याच्या भांडणात गावकर्‍यांनाच आरोपी करण्याचा पराक्रम पाथर्डी पोलिसांनी केला आहे. फिर्यादीने पोलीस अधीक्षकांना हकिगत ऐकविल्यानंतर त्यांनी गावकर्‍यांची नावे आरोपीतून वगळ्याचे आदेश दिले, पण पाथर्डी पोलिसांनी हे आदेश धाब्यावर बसवत, गावकर्‍यांना हेलपाटे मारायाला लावले आहे.

  • अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपीस इंदापूर येथून अटक केली. त्यास श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणीत अटकेतील आरोपींच्या संख्या आता तीन झाली आहे. अजूनही एक आरोपी पसार आहे.

  • आरटीओ विभाग सुस्त! लोकमत - ५ तास पूर्वी

    संदीप रोडे ल्ल अहमदनगर
    नगर शहरातील बेशिस्त वाहतुकीला कारणीभूत असलेल्या पॅगो रिक्षाचालकांकडून कायद्याचे उल्लंघन होत असताना आरटीओ विभाग मात्र सुस्त पडून आहे. पोलीस कारवाईपेक्षा आरटीओची कारवाई प्रभावी आहे, मात्र वाहतुकीला शिस्त लावण्याची इच्छाशक्ती नसलेल्या आरटीओ विभागाभोवतीचे संशयाचे वलय निर्माण झाले आहे.

  • अहमदनगर: नव्याने होणा-या प्रभागरचनेसाठी आता आयुक्तांसोबत नगररचनाकारांनाही जबाबदार धरले जाणार आहे. आधी आयुक्तांच्या सहीनेच प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येत होता. आता या नियमामध्ये बदल करून प्रभागरचनेच्या नकाशावर नगररचनाकांराची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना नकाशा प्रमाणित करण्याचे आदेश दिले आहेत.

  • मलनिस्सारण प्रकल्प रखडला लोकमत - ५ तास पूर्वी

    अहमदनगर: शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी विनाप्रक्रिया सीना नदीत सोडण्यात येत असल्याने नगर तालुक्यातील ११ गावांची शेतजमीन प्रदूषित झाली आहे. महापालिकेने हे पाणी सोडण्याचे थांबविले नाही, तर महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी घेतली आहे.

  • औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर त्याविरोधात नगर, नाशिक जिल्ह्यातील तीन-चार नगर परिषदांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली; परंतु मराठवाड्यातील एकही नगर परिषद या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पुढे आली नाही. किमान औरंगाबाद पालिका जरी सर्वोच्च न्यायालयात गेली असती तर कदाचित जायकवाडीत सोडलेले पाणी थांबले नसते, अशी खंत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी आज व्यक्त केली.

आणखी ताज्या बातम्या »