- वीज कामगारांचे आजपासून आंदोलन लोकमत - सोम, २० मे २०१३
पारस : प्रलंबित मागण्यांसाठी ११ विद्युत कामगार संघटना सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार असून, सायंकाळी द्वार सभा होणार आहे. २१ ते २३ मे या कालवधीत काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येणार आहे. कामगार संघटनांनी औष्णिक वीज केंद्राच्या प्रशासनाला १३ मे रोजी सादर केलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला होता.
- वाशिम जिल्हा सोयाबीन पार्क होणार - विनायक मेटे लोकमत - सोम, २० मे २०१३
मालेगाव : वाशिम जिल्हा सोयाबीन पार्क होणार आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात सोयाबीन बियाणे निर्मिती व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मालेगाव शहरासाठी भूमिगत गटार योजना राबवून मलमुत्रावर प्रक्रिया करणारा एस.टी.पी. प्रकल्प उभारण्यात येणार आहे.मालेगाव शहराच्या ११ कोटी अंदाजित खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरात मिळणार आहे. यासह अनेक प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मे रोजी मुंबई येथे बैठक बोलावल्याची माहिती विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांनी आज १९ मे …
- जिल्हा बँक गैरव्यवहारात दोषी आढळल्यास राजकीय संन्यास … लोकमत - सोम, २० मे २०१३
बिबी : जिल्हा सहकारी बँकेने शेतमालावर प्रक्रिया करणार्या संस्था व कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशाच लोकांनी बँकेच्या विरोधात टाहो फोडणे सुरु केले आहे. यामध्ये मी दोषी आढळल्यास राजकारण सोडण्यास तयार आहे. असा दावा आमदार डॉ. राजेंद्र शिं्ांगणे यांनी बिबी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात केला.
- म्हसला बु. येथे शेतकर्याची आत्महत्या लोकमत - सोम, २० मे २०१३
बुलडाणा: एका ६५ वर्षीय वृद्ध भूमिहिन शेतमजुराने राहत्या घरात दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १९ मे रोजी तालुक्यातील म्हसला बुद्रूक येथे घडली.
- मानव विकासची एसटी प्रवाशांच्या सेवेत लोकमत - सोम, २० मे २०१३
बुलडाणा : आदिवासी बहुल तालुक्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांंंना मोफत प्रवासासाठी शासनाने विशेष स्कुल बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसमधुन विद्यार्थी तालुका व जिल्हा मुख्यालयी शिक्षणासाठी मोफत ये-जा करतात. सध्या शाळांना सुट्या असल्यामुळे ह्या बसेस प्रवासी वाहतुक करुन राज्य परिवहन महामंडळाला चांगले उत्पन्न मिळवुन देत आहेत.
- वाढत्या उकाड्याने खामगावकर हैराण लोकमत - सोम, २० मे २०१३
खामगाव : खामगाव शहराच्या तापमानाचा पारा आज ४७ अंशावर पोहोचला होता. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. मागील दोन दिवसापासून शहरावर ढगाळ वातावरण असल्याने गर्मी वाढली आहे. त्यातच आज उन्हानेही तडाखा दिला. आणखी दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता तापमानमापक प्रकाश पारेख यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेत आहे. तर कामाशिवाय दुपारी कोणीही घराबाहेर पडताना दिसत नव्हते.
- शेतकर्यांना मिळणार थेट शेतबांधावर बियाणे लोकमत - सोम, २० मे २०१३
गिरीश राऊत ल्ल खामगाव
येत्या खरीप हंगाम २0१३ पासून राज्य शासनाच्यावतीने कृषी विभागामार्फत थेट बांधावर बियाणे वाटप उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी शेतकरी गटाकडून नोंदणी सुरू झाली आहे. सन २0१२ पासून बांधावर खतवाटप योजनेच्या यशस्वितेच्या धर्तीवर यावर्षीपासून खतासोबतच बियाणेसुद्धा देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटांकडून लागणार्या बियाणेबाबत आकडेवारीची नोंदणी मंडळ, तालुका स्तरावर संकलित करण्यात येत आहे. - जीवनदायिनी ‘वान’ कोरडी पडली लोकमत - सोम, २० मे २०१३
वडगाव वान : वडगाव वान परिसराची जीवनदायिनी असलेली ‘वान’ नदी आज पाण्यावाचून कोरडी पडली असल्याने परिसराला अवकळा आली आहे.
- गळफास घेऊन दोघांची आत्महत्या लोकमत - सोम, २० मे २०१३
खामगाव : येथे एका विद्यार्थ्याने तर संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.
- ज्योती केला ठरल्या बुलडाण्याच्या मास्टरशेफ लोकमत - सोम, २० मे २०१३
बुलडाणा: एकाहून एक सरस अशा खाद्य पदार्थांंचा घमघमाट, सर्व पदार्थांंची आकर्षक मांडणी अशा वातावरणात काल, १८ मे रोजी बुलडाण्याची मास्टर शेफ निवडण्यात आली. लोकमत व रामबंधू मसाले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्राचा मास्टरशेफ’साठी पार पडलेल्या पाककृती जिल्हास्तरीय स्पध्रेमध्ये मलकापूरच्या डॉ.ज्योती मुकेश केला या बुलडाण्याच्या मास्टर शेफ ठरल्या आहेत.
- खताचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक लोकमत - सोम, २० मे २०१३
बुलडाणा - खरीप हंगामात बियाणे व खते यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने १४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे भरारी पथक विविध कृषी केंद्रांवर धाड टाकून खते व बियाण्यांचा साठा तपासतील. शेतकर्यांनी काळ्याबाजारातून खते आणि बियाणे घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
- पाण्याचे स्रोत झाले अशुद्ध लोकमत - सोम, २० मे २०१३
नीलेश शहाकार ल्ल बुलडाणा
दुष्काळ परिस्थितीत सध्या शहर आणि ग्रामीण परिसरात सकाळ-संध्याकाळ असा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या पाण्याचे निर्जंंतुकीकरण झाले नसल्याने हे पाणी दूषित आढळून आले आहे. या पाण्यात रासायनिक घटकांचे प्रमाण वाढलेले आढळून आले आहे. यामुळे हे पाणी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आता बाधित ठरत आहे. - बदली आदेश पोहचायला लागले तीन महिने लोकमत - सोम, २० मे २०१३
लोणार : लोणार नगरपालिकेमध्ये सतत वादग्रस्त ठरलेले मुख्याधिकारी दीपक इंगोले यांचा बदली आदेश नगर पालिकेपर्यंत पोहोचण्यास तब्बल तीन महिन्याचा कालावधी लागला. त्यामुळे कार्यालयीन कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
- बर्हाणपूर रोडच्या पूर्णत्वानंतर जळगावची होणार व्यापार … लोकमत - सोम, २० मे २०१३
नानासाहेब कांडलकर - ज. जामोद
अर्ध शतकापासून प्रलंबित असणारा जळगाव ते बर्हाणपूर रोडचा प्रश्न मार्गी लागल्याने जळगाव जामोद नगराच्या व्यापारात वाढ होण्याचे संकेत आहेत. तसेच आडमार्गावरील असलेले जळगाव नगर आंतरराज्य महामार्गावर सुध्दा येणार आहे.
अकोला
ताज्या बातम्या
लोकप्रिय फोटोंची गॅलरी
25 पैकी 1 - 4
